Strawberry : भीमाकाठी फुलला ‘स्ट्रॉबेरीचा मळा; 10 गुंठ्यामध्ये 4 लाखांचे उत्पन्न, पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याचा आदर्श
strawberry framing Pandharpur : थंड हवेच्या ठिकाणी नाही तर चक्क गोदाकाठी एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. 10 गुंठे शेतात या तरूण शेतकऱ्यानं 4 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्याच्या या अभिनव प्रयोगाची तालुक्यातच नाही तर सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे.
स्टोबेरीचे उत्पादन महाबळेश्वर पाचगणी व सातारा या ठिकाणी घेतले जाते. तिथे थंड वातावरण असल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. पण थंड हवेच्या ठिकाणी नाही तर चक्क गोदाकाठी एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. 10 गुंठे शेतात या तरूण शेतकऱ्यानं 4 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्याच्या या अभिनव प्रयोगाची तालुक्यातच नाही तर सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्ट्रॉबेरीला ग्रामीण भागात चांगली मागणी होत आहे. या विक्रीतून त्याला चांगला फायदा झाला आहे. तर अनेक शेतकरी त्याची ही शेती पाहण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी येत आहेत.
शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग
कृष्णा कोयनेच्या काठावरील फळपीक आता भीमेच्या तिरी फुलू लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील चळे येथील तरुण शेतकरी सागर शिंदे याने 10 गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली यामधून त्याला 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चळे येथील शेतकरी तरुण सागर शिंदे याने पारंपारिक शेतीला फाटा देत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला.
ऊस लागवडीला फाटा
सगर शिंदे याने अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने ऊस लागवडीकडे पाठ फिरवली. शेतात स्ट्रॉबेरीची 10 गुंठे जागेत लागवड केली. त्यासाठी त्याने मेहनत आणि कष्ट घेतले. त्याला या बागेतून उत्पादन सुरू झाले. त्याला 4 लाख रुपये उत्पन्न मिळाले. भीमेच्या तीरावर फुललेली ही स्ट्रॉबेरी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक शेतकरी त्याची ही शेती पाहण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी येत आहेत.
स्ट्रॉबेरीला ग्रामीण भागात मागणी
सोलापूर जिल्ह्यातील विविध गावात तो स्ट्रॉबेरीची विक्री करत आहे. त्याच्या रसाळ आणि चवीला खास असलेल्या स्ट्रॉबेरीला ग्रामीण भागात चांगली मागणी आली आहे. शेतकरी कुटुंबातील तरुण उच्च शिक्षण घेत आहे. मात्र मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तो शेतीकडे वळला. शेतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून वेगवेगळी पिके घेण्याकडे त्याचा कल वाढला. यामुळे शेतकर्याला चांगला फायदा झाल्याचे दिसत आहे. सागर शिंदे याचा कित्ता अजून काही तरुणांनी राबवला तर त्यांना तुटपुंज्या पगारावर शहरात आयुष्य रखडावं लागणार नाही.