एक मेनंतर गाळप झालेल्या उसाला प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान ; संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

एक मेनंतर गाळप झालेल्या उसाला आता प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

एक मेनंतर गाळप झालेल्या उसाला प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान ; संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 7:27 AM

मुंबई : राज्यात उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा उसाचे (Sugar cane) अतिरिक्त उत्पदन झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उसाला अद्यापही तोड आलेली नाही. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर जादा ऊस क्षेत्र आहे. अनेक शेतकऱ्यांचे (farmers) ऊस गाळप शिल्लक असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांना दिलासा दिण्यासाठी संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच राहणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एक मेनंतर गाळप झालेल्या सर्व उसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टनाप्रमामे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली या बैठकीमध्ये ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टनाप्रमामे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवावेत असे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार साखर कारखाने आता संपूर्ण गाळप होईपर्यंत सुरू राहणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात एक मे 2022 नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन गाळप अपेक्षित आहे. त्यामुळे हा अतिरिक्त 100 कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे.

ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत

दरम्यान गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. पाणी असल्याने अनेक शेतकरी हे उसाच्या शेतीकडे वळले. परिणामी चालू हंगामात तब्बल 2.25 लाख हेक्टर जादा ऊस क्षेत्र वाढले आहे. यामुळे साखरे कारखान्यांचे नियोजन कोलमडले असून, मे महिना सुरू झाला तरी देखील अनेक शेतकऱ्यांच्या उसाला अद्यापही तोड आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण गाळप होईलपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.