शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे महावितरणची बत्ती गुल, एका दिवसामध्ये कृषी पंपाचा प्रश्न मार्गी

शेतकऱ्यांच्या आक्रमकपणा पाहून अवघ्या काही तासांमध्येत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन आता टप्प्याटप्प्याने कृषीपंपाची वसुली करण्याची तयारी दर्शवली आहे. महावितरणच्या आश्वासनानंतर अखेर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे महावितरणची बत्ती गुल, एका दिवसामध्ये कृषी पंपाचा प्रश्न मार्गी
नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावच्या शेतकऱ्यांनी कृषीपंप जोडणीसाठी अर्धापूर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे कृषीपंपाची विज जोडणी करण्याचे आश्वासन महावितरणने दिले आहे.
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 7:18 PM

नांदेड : शेतकऱ्यांची एकजूट झाली तर काय होऊ शकते हे गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील कोंढा गावच्या ग्रामस्थांनी दाखवून दिलेले आहे. कृषीपंपाची थकबाकी अदा करण्यास शेतकरी तयारी असतानाही महावितरणने आडमुठी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या आक्रमकपणा पाहून अवघ्या काही तासांमध्येत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन आता टप्प्याटप्प्याने कृषीपंपाची वसुली करण्याची तयारी दर्शवली आहे.

महावितरणच्या आश्वासनानंतर अखेर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. गेल्या अने दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने जनावरांना पाणी देखील देणे मुश्किल झाले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी एका दिवसांमध्ये हा प्रश्न निकाली काढला आहे.

महावितरणचे आश्वासन अन् आंदोलन मागे

वीजबिल वसुलीसाठी कोंढा गावातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ कोंढा गावातील ग्रामस्थांनी अबालवृद्धासह अर्धापुरच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. अख्ख गांव महावितरणच्या कार्यालयावर धडकल्याने महावितरणने झुकते घेत कृषी पंपाची वीज जोडणी आजच करून देण्याचे आश्वासन दिले. कृषी पपधारकाकडे असलेली थकबाकी टप्प्याटप्प्याने घेण्याचे महावितरणने मान्य केलय. त्या नंतर कोंढा येथील गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या संघर्षाचा वारसा लाभलेल्या कोंढा ग्रामस्थानी व्यवस्थे विरोधात लढण्याची परंपरा आजही कायम राखल्याने जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनलाय.

नेमके काय होते प्रकरण?

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे. मात्र, पिकांना पाणी देण्याचे तर सोडाच पण विद्युत पुरवठाच खंडीत असल्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करणेही शक्य होत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनावरांचे हाल होत आहे. किमान काही वेळ ठरवून विद्युत पुरवठा सुरु ठेवण्यााची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे दोन वेळचे पाणी देणेही मुश्किल झाले आहे. दरवर्षी पाणी नसल्याने पिकांचे नुकसान होत असते तर यंदा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे गुरुवारी कोंढा येथील शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रॅक्टरसह मोर्चा काढला. या मोर्चात महिला व बालकासह हजारो नागरीक सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

Change in crop pattern : मराठवाड्यातही ऊस गाळपात अन् लागवड क्षेत्रातही होतेय वाढ

Damage to vineyards : बुडत्याला काडीचा आधार, फळबागांचे नुकसान लाखोंत अन् भरपाई हजारो रुपयांमध्ये

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.