आंध्र प्रदेशातील शेतकऱ्याचं लाखोंच उत्पन्न, मोठमोठ्या व्यावसायिकांनाही टाकलं मागं

नलगोंडा जिल्ह्यातील इदुलुरू गावच्या नारायण रेड्डी (Narayan Reddy) यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढताना शेतीमध्ये मोठी झेप घेतली आहे.

आंध्र प्रदेशातील शेतकऱ्याचं लाखोंच उत्पन्न, मोठमोठ्या व्यावसायिकांनाही टाकलं मागं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 10:41 AM

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील या शेतकऱ्याची संघर्षकथा वाचून तुम्हालाही नक्की प्रेरणा मिळेल.प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपला मार्ग शोधून प्रगती करुन दाखवतात. नलगोंडा जिल्ह्यातील इदुलुरू गावच्या नारायण रेड्डी (Narayan Reddy) यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढताना शेतीमध्ये मोठी झेप घेतली आहे. आता ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.आंबा आणि मोसंबीच्या लागवडीमध्ये नारायण रेड्डी यांनी मोठे नाव कमावले आहे. आजही ते यातून मोठा नफा कमावत आहे. आंबा आणि मोसंबी विक्री, दूध विक्री आदीतून वर्षाकाठी सुमारे 28 लाखांचं उत्पन्न मिळवतात. (Success Story of Andhra Pradesh Farmer Narayan Reddy in mango cultivation)

आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्हाला अतिवृष्टीचा फटका बसतो. नारायण रेड्डी यांच्या शेतीलाही याचा फटका बसला आहे. या जिल्ह्यात दुष्काळ आणि पिकाचा अपव्यय किंवा पिके नष्ट होणे ही तर नेहमीचीच गोष्ट होती. गरिबी येथील शेतकऱ्याची पाठ कधीच सोडत नाही. दगड जमीन, गुरे, चाऱ्याचा तुटवडा आणि गरिबीशी इथल्या शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. परंतु या सर्व प्रतिकूल गोष्टींवर मात करून नारायण रेड्डी यांनी शेतीलाच गरिबी मुक्तीचा मार्ग बनवला.

शेतीला सुरुवात

नारायण रेड्डी यांना गरिबीतून बाहेर पडण्यासाठी पारंपारिक शेतीला सोडून द्यावं लागेल, हे समजलं होते. म्हणून काही पैसे जमवून नारायण रेड्डी यांनी नवीन जमीन खरेदी केली. त्यांनी शेती सुधारण्यासाठी त्यांनी पाणी व मृदा संवर्धनावर भर दिला. डोंगराळ प्रदेश असल्याने शेतात पाणी राहावे म्हणून त्यांनी पाण्याचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना केली. शेतांच्या कडेला पाणी साचण्यासाठी व्यवस्था केली. त्याचा फायदा शेतातील पाणी पातळी वाढण्यात झाली आणि यामुळे शेतीसाठी आवश्यक आर्द्रता मातीत येऊ लागली. नारायण रेड्डींनी या शेतात आंबा आणि मोसंबीची लागवड केली. जनावरांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाची व्यवस्था,जवळपासच्या विहिरी, तलावांची दुरुस्ती केली. पुढे सिंचनासाठी नवीन बोअरवेल काढल्या. सिंचनासाठी कमी पडणाऱ्या पाण्याची सोय बोअरवेल मधून झाली. शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी नारायण रेड्डींनी गावात राहणं बंद करुन शेतातचं घर बांधलं आणि ते त्यातचं रमले.

शास्त्रीय पद्धतीनं केलेल्या शेतीचा परिणाम असा झालाय की आता नारायण रेड्डी यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 30 लाख रुपये आहे. शेतामध्ये सिंचन करताना आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला.त्यासाठी ड्रीप इरिगेशनचा वापरदेखील रेड्डी यांनी केला. आंबा आणि मोसंबीची झाडं लावण्यासाठी जमिनीचं सपाटीकरण केलं आणि झाडे लावली गेली. डोंगराळ भागामुळे या कामात अडचण होती, पण त्याशिवाय शेती यशस्वी होणार नाही. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर सिंचनासाठी केला.

आंबा आणि मोसंबी शेतीसाठी पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून नारायण रेड्डींनी तलाव खोदले. रेड्डींनी त्या तलावांमध्ये मासे पालन करण्यास सुरुवात केली. 2 हेक्टर क्षेत्रावरील तलावामधून पिकांना पाणी मिळू लागलं. इंटिग्रेटेड प्लांट न्यूट्रिंट्स सिस्टम (आयपीएनएस) अंतर्गत या वनस्पतींना खत, औषधं, हिरवं खत आणि गांडूळ खत देण्यात आले. नारायण रेड्डींनी यानंतर बाजारपेठेच्या मागणीनुसार पिके आणि फळांच्या लागवडीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

पाच हजार लीटर दूधाची विक्री

आंबा आणि मोसंबीच्या लागवडीबरोबरच नारायण रेड्डी यांनीही पशुसंवर्धनाकडे लक्ष दिले. त्यांच्याकडे शेताची कमतरता नव्हती त्यामुळे त्यांनी पशुपालन व्यवसाय देखील सुरु ठेवला. नारायण रेड्डींनी जास्त दूध देणाऱ्या म्हशी आणि गायींचे संगोपन केल्यानं त्यांना फायदा झाला. नारायण रेड्डींना आता तीन वर्षांच्या आंब्याच्या झांडापासून प्रति हेक्टरी 5 टन आंबे मिळतात. तर, प्रति हेक्टर सात टन मोसंबीचं उत्पादन मिळतंय. नारायण रेड्डी यांनी मोठा गोठा उभारला असून साडे पाच हजार लीटर दूध विक्री केली जाते.

नारायण रेड्डींना सर्वाधिक उत्पन्न आता दूध व्यवसायातून मिळू लागलं आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 43% उत्पन्न दूध व्यवसायातून मिळतंय. तर फळबागेतून (आंबा आणि मोसंबी) 30 टक्के पर्यंत उत्पन्न मिळत. इतर पिकांमधून नारायण रेड्डींना 17 टक्के कमाई होते. ते आता गांडूळ खत देखील बनवतात अणि विक्री करतात.नारायण रेड्डींना आंबा फळबागेतून वार्षिक 3.40 लाख, मोसंबी विक्रीतून 5 लाख, धान्य विक्रीतून 4.80 लाख, कुक्कुटपालनातून 50 हजार, दूध विक्रीतून 12 लाख आणि गांडूळ खत विक्रीतून 2 लाख मिळतात. नारायण रेड्डींना त्यांच्या 44 एकरावरील शेतीतून सुमारे 28 लाखांचं उत्पन्न मिळतंय.

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी; 12 हजार कोटींचा निधी मंजूर, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार मिळणार

झुकिनी…. ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला, नांदेडच्या शेतकऱ्याने बक्कळ कमावले!

(Success Story of Andhra Pradesh Farmer Narayan Reddy in mango cultivation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.