डोकं लावून शेती केली, 500 एकरवर कोथिंबीर पिकवली, 90 दिवसात लाखो कमावले!

देगलूर तालुक्यातील शहापूरच्या असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येत धन्याच्या उत्पादनासाठी ही कोथिंबीर (Dhaniya) लावली.

डोकं लावून शेती केली, 500 एकरवर कोथिंबीर पिकवली, 90 दिवसात लाखो कमावले!
नांदेड कोथिंबीर लागवड
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 12:24 PM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शहापूर (Nanded Shahapur Farmer) भागात तब्बल पाचशे एकरवर कोथिंबिरीची लागवड करण्यात आली आहे. देगलूर तालुक्यातील शहापूरच्या असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येत धन्याच्या उत्पादनासाठी ही कोथिंबीर (Dhaniya) लावली. कमी खर्च कमी कष्टात हे पीक एकरी 50 हजार रुपयांचा नफा मिळवून देत आहे. (Success story of Nanded Farmers growing green coriander kothimbir farming )

90 दिवसांत येणाऱ्या कोथिंबिरीतून एकरी दहा क्विंटल धन्याचे उत्पादन होते. साधारणतः सात हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव धन्याला मिळतो. एरव्ही आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून धन्याची लागवड होत असते. मात्र शहापूरच्या या शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून धने लागवड केली आहे. त्यामुळे पीक पद्धतीत होणाऱ्या बदलातून जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत मिळणार आहे.

green coriander farming_kothimbir 2

एकच पीक वारंवार घेतल्याने घाटे अळी, मर रोगासारख्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पारंपरिक पिकांना बगल देत शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केली. धन्याच्या पिकांवर फारसा कीड प्रादुर्भाव होत नाही, त्यातून फवारणीचा खर्च होत नाही.

गहू हरभऱ्याच्या तुलनेत धन्याला पाणीही कमी लागते, तर धण्याची काढणी, मळणी गव्हाच्या पिकासारखीच हार्वेस्टरने केली जाते. त्यातून शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे शहापूरच्या परिसरात सर्वत्र कोथिंबीरीचा सुगंध दरवळतोय.

green coriander farming_kothimbir

कोथिंबीर लागवड

कमी खर्च कमी कष्टात आणि अगदी सहज उत्पन्न होणारे पीक म्हणून कोथिंबीरीच्या पिकांची ओळख आहे. बहुतांश शेतकरी घरी खाण्यासाठी गव्हू किंवा हरभरा पिकात धन्याची एखादी ओळ पेरत असतात. त्यातून घरच्या कोथिंबीरीसह धन्याची गरज भागते. तर भाजीपाला पिकवणारे शेतकरी देखील आंतरपीक म्हणून धने लागवड करतात, त्यातून आलेल्या हिरव्या कोथिंबीरीची बाजारात नेऊन विक्री करतात. कोथिंबीरीच्या विक्रीतून थैलीभर पैसे घेऊन जाणाऱ्या अश्याच एका शेतकऱ्यांचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

मात्र या सगळ्या प्रकारापेक्षा शहापूर इथल्या शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून थेट कोथिंबीरीची लागवड केलीय. एका एकर शेतीत पन्नास हजार रुपयांचा नफा मिळवून देणारे पीक म्हणून कोथिंबीरीची ओळख आहे. अवघ्या 90 दिवसांत येणाऱ्या कोथिंबीरीतून एकरी दहा क्विंटल धन्याचे उत्पादन होते. साधारणतः सात हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव धन्याला मिळतो. एरव्ही आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून धण्याची लागवड होत असते मात्र शहापुरच्या या शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून धने लागवड केलीय. त्यामुळे पीक पद्धतीत होणाऱ्या बदलातून जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत मिळणार आहे.

एकच पीक वारंवार जमिनीत घेतल्याने घाटे अळी, मर रोगा सारख्या बुरशीचा प्रादुर्भाब वाढल्याने पारंपारीक पिकांना बगल देत शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केलीय. धन्याच्या या पिकांवर फारसा कीड प्रादुर्भाव होत नाही, त्यातून फवारणीचा खर्च होत नाही. गव्हू हरभऱ्याच्या तुलनेत धन्याला पाणीही कमी लागते, तर धण्याची काढणी- मळणी गव्हाच्या पिकासारखीच हार्वेस्टर ने केल्या जाते. त्यातून शेतकरी या पिकाकडे आकर्षितकमी खर्च कमी कष्टात हे पीक एकरी पन्नास हजार रुपयांचा नफा मिळवून देतंय. 90 दिवसांत येणाऱ्या कोथिंबीरीतून एकरी दहा क्विंटल धन्याचे उत्पादन होते. साधारणतः सात हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव धन्याला मिळतो.

एरव्ही आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून धण्याची लागवड होत असते मात्र शहापुरच्या या शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून धने लागवड केलीय. त्यामुळे पीक पद्धतीत होणाऱ्या बदलातून जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत मिळणार आहे. एकच पीक वारंवार जमिनीत घेतल्याने घाटे अळी, मर रोगा सारख्या बुरशीचा प्रादुर्भाब वाढल्याने पारंपारीक पिकांना बगल देत शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केलीय. धन्याच्या पिकांवर फारसा कीड प्रादुर्भाव होत नाही, त्यातून फवारणीचा खर्च होत नाही. गव्हू हरभऱ्याच्या तुलनेत धन्याला पाणीही कमी लागते, तर धण्याची काढणी- मळणी गव्हाच्या पिकासारखीच हार्वेस्टर ने केल्या जाते. त्यातून शेतकरी या पिकाकडे आकर्षित झालाय. त्यामुळे शहापुरच्या परिसरात सर्वत्र कोथिंबीरीचा सुंगध दरवळतोय.

विशेष म्हणजे आगामी काळात धने पावडर बनवणारी मशीन खरेदी करून कंपनी स्थापन करण्याची या शेतकऱ्यांची इच्छा आहे. परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोथिंबीरीची केलेली ही यशस्वी शेती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी शहापुरला येत असतात. आता या शेतकऱ्यांना जिरे पावडर चा कारखाना सुरू करायचा असून त्यांच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले आहेत. एकीच्या बळामुळे खर्चिक त्रासदायक बनलेली शेती इथल्या शेतकऱ्यांनी कमी खर्चात फायद्याची बनवलीय. राज्यातील अन्य शेतकऱ्यांनी देखील अश्याच पद्धतीने गट शेती करत वेगळा मार्ग चोखाळला तरच शेती परवडण्यासारखी होईल, यात शंका नाही !

VIDEO 

संबंधित बातम्या 

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज लागतं, शेतकरी त्यांचा पैसा कसा वाचवू शकतात?, जाणून घ्या

हरियाणा सरकारची मोठी घोषणा; ‘या’ नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा  

(Success story of Nanded Farmers growing green coriander kothimbir farming )

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.