Monsoon : भारतामध्ये मान्सूनचा असा ‘हा’ प्रवास, आगमनानंतर महिन्याभरात मिळतो दिलासा..!
भारतीय हवामान विभागाने देशात प्रमुख चार विभाग केले आहेत. यामध्ये वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असे चार विभाग आहेत. तर भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 887.5 मिमी एवढा आहे. यामध्ये वायव्य भागात 615, मध्य भारक विभागाची 975.5 मिमी, पूर्व व इशान्य भागाची 1438.3 त, दक्षिण विभागाची 716.01 मिमी अशी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी याच प्रमाणात पाऊस होतो असे नाही. कमी-अधिकपणा हेच मान्सूनचे वैशिष्ट आहे.
मुंबई : मान्सूनवरच (Agricultural) शेती व्यवसाय अवलंबून असला तरी हा पाऊस अनियमित आणि अनिश्चित म्हणूनच ओळखला जातो. गेल्या काही वर्षापासून (Monsoon Entry) आगमन उशिराने होत असले तरी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या समस्या मिटत आहेत. मात्र, (Kharif Season) खरीप पिकांचे नुकसान हे ठरलेले आहे. देशात 20 मे पासून मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतातच. 20 मे पासून चाहूल लागत असली तरी देशात सर्वत्र पोहण्यासाठी मान्सूनला 25 दिवासांचा कालावधी लागतो. दरवर्षीच्या निरिक्षणानुसार मान्सून आगमनाच्या तारखा ह्या ठरलेल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. पण यंदा भारतीय हवामान विभाग आणि’स्कायमेट’ वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. वेळेत पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांचे नुकासान तर टळतेच पण खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो.
भारतामध्ये मान्सूनचा असा प्रवास
सर्वप्रथम 20 मे च्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत 1 जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो 5 जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो.नंतर 10जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. दरवर्षी वेळेवरच मान्सून दाखल होईल असे नाही तर कधी-कधी 5 ते 6 दिवसांनी तो उशिराही दाखल होतो.
देशातील 4 प्रमुख विभागात मान्सूनचे वर्गीकरण
भारतीय हवामान विभागाने देशात प्रमुख चार विभाग केले आहेत. यामध्ये वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असे चार विभाग आहेत. तर भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 887.5 मिमी एवढा आहे. यामध्ये वायव्य भागात 615, मध्य भारक विभागाची 975.5 मिमी, पूर्व व इशान्य भागाची 1438.3 त, दक्षिण विभागाची 716.01 मिमी अशी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी याच प्रमाणात पाऊस होतो असे नाही. कमी-अधिकपणा हेच मान्सूनचे वैशिष्ट आहे.
पावसामध्ये अनियमतिता, परतीच्या पावसाने दिलासा
मान्सूनच्या पावसावर केवळ भारतीय शेतीच नाही तर अशिया खंडातील जवळपास सर्वच देश याच पावसावर अवलंबून आहेत. मान्सूनवर सर्वकाही अवलंबून असले तरी हाच मान्सून अनियमित आणि अनिश्चित असा आहे. आतापर्यंत मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे देशात मान्सूनचा प्रवास कसा राहणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.