Sugarcane Sludge : उत्तर महाराष्ट्रात वाढला ऊसाचा ‘गोडवा’ पण शेतकऱ्यांच्या मागण्याही होणार का पूर्ण?
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप आणि आता रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नगदी पिकाला अर्थात ऊसाला याचा फटका बसलेला नाही. काही काळ ऊस पाण्यात होता पण त्याचा उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे यंदाच्या गाळपावरुन समोर येत आहे.
नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप आणि आता रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या (Cash Crop) नगदी पिकाला अर्थात ऊसाला याचा फटका बसलेला नाही. काही काळ ऊस पाण्यात होता पण त्याचा उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे यंदाच्या गाळपावरुन समोर येत आहे. पोषक वातावरणामुळे (North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हयातील तीन साखर कारखान्यांच्या माध्यमातून विक्रमी 9 लाख 64 हजार मेट्रिक टन (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून 9 लाख 34 हजार क्विंटल साखर चे उत्पादन झाले आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना अधिकच्या क्षेत्रावरील तोड बाकी आहे. त्यामुळे ऊस तोड लवकर व्हावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत. एप्रिलपर्यंत यंदाचा हंगाम कायम राहिल असा अंदाज आहे.
असे झाले ऊसाचे गाळप
यंदा सर्वाधिक उसाचे गाळप आयन मल्टी ट्रेड कारखान्याने केलं आहे. 6 लाख 50 मेट्रिक टन उसाचे गाळप केलं आहे. त्यानंतर सातपुडा आणि आदिवासी सहकारी कारखान्यांनी ऊस खरेदी केली सर्वाधिक साखरेचा उतारा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा आहे. कारखान्याने 92 हजार 673 मेट्रिक टन उसाचे गाळप केलं असून 93 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलं आहे. त्यांचा साखरेचा उतारा 10.21 टक्के आहे इतर. दोघा कारखान्याचा उतारा 9 टक्के पर्यंत आहे. गाळप क्षमता पूर्ण होताच काही साखर कारखान्यांनी गाळप हे बंद केले आहे. त्यामुळे ऊसाचे काय हा प्रश्न कायम आहे.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम
ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. त्यामुळे उत्पादनवाढीच्या अनुशंगाने क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय यंदा तर पोषक वातावरण आणि मुबलक पाणी असल्याने क्षेत्रात वाढ झाली होती. त्यामुळे गाळपही विक्रमी झाले आहे. पण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. अजूनही हंगाम पूर्ण होण्यासाठी 60 दिवासांचा कालावधी आहे. या दरम्यान, शिल्लक ऊसाची तोडणी होणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने कारखाना प्रशासनानेही नियोजन करणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने प्रयत्न केले जात असल्याचे ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
साखर आय़ुक्तांच्या काय आहेत सूचना?
यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली असली तरी अजूनही शेतकऱ्यांचा ऊस हा वावरातच आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक आहे. अजूनही दोन महिने ऊसाचे गाळप होणार आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळर कसे पूर्ण होईल याचे नियोजन कारखाना प्रशासनाने करणे गरजेचे आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप होईपर्यंत संबंधित कारखान्याला गाळप बंद करता येणार नाही. अधिकच्या काळामुळे उत्पादनात घट होते तर त्यामधील गोडवाही कमी होतो. त्याच अनुशंगाने नियोजन करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा ‘तो’ एकच निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’
Untimely Rain : धोका कायम, भंडाऱ्यात पुन्हा अवकाळीची शक्यता! पिकांची घ्यावी लागणार काळजी