निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी ‘ही’ वेळ

फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झालाच आहे पण त्यानंतरही पावसामध्ये सातत्य हे राहिलेले आहे. महिन्याभरापूर्वी अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत होते तर आता पाणीटंचाईमुळे पिके करपून जात आहेत. हो अशीच काहीशी परस्थिती दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील पूर्व भागातील आहे.

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी 'ही' वेळ
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे टॅकरने विकतचे पाणी घेऊन पिकांना द्यावे लागत आहे.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:08 PM

लासलगाव: फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून (Crop) पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झालाच आहे पण त्यानंतरही पावसामध्ये सातत्य हे राहिलेले आहे. महिन्याभरापूर्वी (Heavy Rain) अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत होते तर आता (Water Supply) पाणीटंचाईमुळे पिके करपून जात आहेत. हो अशीच काहीशी परस्थिती दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील पूर्व भागातील आहे. राजापूर सह परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठल्याने टँकर ने पाणी विकत घेऊन कांदा पिक वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु झाली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सर्वकाही पोषक आहे असे म्हणता येणार नाही. विकतच्या पाण्यावर शेतकऱ्यांना कांद्याची जोपासणा करवी लागत आहे.

एका टॅंकरसाठी 3 हजार रुपये

येवला तालुक्यातील पुर्व भागामध्ये पावसाचे प्रमाण तसे कमीच असते. मात्र, यंदा सरासरी एवढा पाऊस झाल्याने ही नामुष्की फेब्रुवारी महिन्यातच उद्भवेल असे वाटत नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून अचानक विहिरींनी तळ गाठला आहे. आणि एकदा तळ गाठला की पुन्हा पाणीपातळीत वाढ होत नाही हे ठरलेलेच आहे. त्यामुळे राजापूर,ममदापुर ,देवदरी या पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता 25 हजार लिटरचा टॅंकर 3 हजार रुपये प्रमाणे विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. कांद्याबरोबर जनावरांच्या पिण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. जनावरांची तहानही विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे.

उन्हाळा सुरु होताच ओढावते ही परस्थिती

येवला तालुक्यातील पुर्वेकडील भाग हा दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातो. असे असले तरी अधिकचे उत्पन्न मिळावे या आशेने शेतकरी कांदा लागवड करतात. लागवडीपासून पाण्यापर्यंतच्या बाबीसाठी शेतकऱ्यांना पैसेच मोजावे लागत आहेत. त्यामुळे कांदा पीक पदरी पडले तरी विक्रीपूर्वीच अधिकचा खर्च झालेला असतो. आता उन्हाळ्याची चाहूल लागताच परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठलेला आहे.

सर्वकाही कांदा पिकासाठी

लासलगाव ही कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठ आणि कांद्याचे वाढते दर यामुळे शेतकरी कांद्याशिवाय दुसरे पीक घेत नाहीत. यंदा समाधानकारक पावसामुळे पाणी टिकून राहिल असा आशावाद होता पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच असून आता पासूनच विकतच्या पाण्यावर पीक जोपासावे लागत आहे. त्यामुळे पीक पदरी पडण्यापूर्वीच अधिकचा खर्च या भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या :

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.