sunil shetty on tomato ‘अभिनेता सुनील शेट्टी आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी’ – टॉमेटो महाग म्हणणाऱ्या सुनील शेट्टीचं जोडलं रेशनिंग कनेक्शन

सुनील शेट्टी याने टोमॅटोचा भाव वाढल्याने जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, यानंतर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये संपात आहे, सुनील शेट्टी याने केलेल्या त्या वक्तव्याला सोशल मीडियावर तर काही जणांनी अभिनेता सुनील शेट्टी आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी असल्याचं म्हटलं आहे, पाहा नेमकं काय झालंय.

sunil shetty on tomato 'अभिनेता सुनील शेट्टी आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी' - टॉमेटो महाग म्हणणाऱ्या सुनील शेट्टीचं जोडलं रेशनिंग कनेक्शन
ACTOR SUNIL SHETTYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 9:17 PM

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. कारण सुनील शेट्टी याने केलेलं वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागणारं ठरतंय. सुनील शेट्टी याने लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर शेती करत असल्याचं म्हटलं असलं, तरी टॉमॅटो उत्पादक शेतकरी सुनील शेट्टी याच्या वक्तव्यावर नाराज आहेत. एवढंच नाही, सोशल मीडियावर सुनील शेट्टी याच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला आहे. यात आनंदाचा शिधा याचा दाखला देखील एका युझर्सने दिला आहे. आनंदाचा शिधा हा दिवाळीला महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारकडून पुरवण्यात आला होता. आनंदाचा शिधा रेशनिंग दुकानातून जनतेपर्यंत पोहोचला होता. सुनील शेट्टी हा अर्थातच एक अभिनेता आहे, उद्योजक आहे, आणि तरीही त्याला कधी तरी वाढलेले टोमॅटोचे भाव जास्त वाटत असतील. तर तो खरा आनंदाचा शिधाचा लाभार्थी आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर आली आहे.

काय आहे आनंदाचा शिधा?

राज्य सरकारने मागील दिवाळीत गरीबांसाठी अवघ्या १०० रुपायात आनंदाचा शिधा म्हणजेच, त्यात १ लीटर पामतेल, १ किलो लाख, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ असं किट बनवून ते शिधापत्रिका धारकांना वाटण्यात आलं होतं. तर सुनील शेट्टी देखील या आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी आहे, अशी खरमरीत टीका सुनील शेट्टी याच्यावर होत आहे.

हे सुद्धा वाचा

टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, आणि त्याचा परिणाम हा आमच्या किचनवरही होत आहे, असं सुनील शेट्टी याने म्हटल्याने शेतकरी संतापले आहेत. टोमॅटोला कधीतरी एवढा चांगला भाव मिळाला आहे, आणि टोमॅटो म्हणजे काही जीवनावश्यक वस्तू नाही. जी हवीच असते, तरी देखील सुनील शेट्टी याने अशी प्रतिक्रिया दिल्याने सुनील शेट्टी विरोधात शेतकरी समूह प्रचंड नाराज झाला आहे.

आणखी काय म्हणाला सुनील शेट्टी

सुनील शेट्टी याने पुढे म्हटलं आहे की, आपली सौभाग्यवती आणि आपलं ताज्या फळे आणि भाज्या खाण्यावरंच जास्त जोर असतो, म्हणून आम्ही ताजा भाजीपाला आणि फळांसाठी फक्त अॅपनेच खरेदी करतो.सुनील शेट्टी याने काही दिवसांपूर्वी एक फूड अॅप लॉन्च केले होते, त्या फूड अॅपच्या प्रमोशनसाठी केलेली ही पोस्ट फसली तर नाही ना, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेता सुनील शेट्टी आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी, असं म्हणताना सुनील शेट्टी यांची लोकांनी लाज काढली आहे. यापेक्षाही भयानक प्रतिक्रिया या सोशल मीडियावर आलेल्या आहेत. सुनील शेट्टीला कदाचित हे माहित नसावं की, १ वेळेस टोमॅटोचा भाव वाढू शकतो, पण ९९ वेळेस तो स्वस्तात जातो.त्यापेक्षाही १ रुपयाला १ किलो टॉमॅटो मार्केटमध्ये विकून येणारे देखील शेतकरी आहेत, ज्यात टॉमॅटोचा खर्चही निघत नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.