Seed Production : जे शासनाला जमलं नाही ते कृषी सहायकाने करुन दाखवंल अन् सोयाबीनच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालं

उत्पादन वाढीसाठी आणि बाजारातील बियाणांमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणावरच भर देण्याचे आवाहन सातत्याने केले जाते. मात्र, प्रत्यक्षात असा उपक्रम राबवण्याकडे याकडे दुर्लक्ष होत आहे. परंतू, जिल्ह्यातील एका कृषी सहायकाने जे करुन दाखवलं आहे त्याचे अनुकरण कृषी विभागातील प्रत्येकानेच करायला पाहिजे.

Seed Production : जे शासनाला जमलं नाही ते कृषी सहायकाने करुन दाखवंल अन् सोयाबीनच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालं
सोयाबीन बिजोत्पादन
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 12:46 PM

अमरावती : उत्पादन वाढीसाठी आणि बाजारातील (Seed Production) बियाणांमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणावरच भर देण्याचे आवाहन सातत्याने केले जाते. मात्र, प्रत्यक्षात असा उपक्रम राबवण्याकडे याकडे दुर्लक्ष होत आहे. परंतू, जिल्ह्यातील एका कृषी सहायकाने जे करुन दाखवलं आहे त्याचे अनुकरण (Agricultural Department) कृषी विभागातील प्रत्येकानेच करायला पाहिजे. कापूसतळणी येथील (Agricultural Assistant) कृषी सहायक मारुती जाधव यांनी गावातील सोयाबीन हे बिजप्रक्रिया करुन गावातच विकले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत तर झालीच आहे पण उत्पादनही वाढले आहे. यासाठी कृषी सहायक यांनी गावातील ग्रामस्थांचा अभ्यास केला व बियाणावर अधिकचा खर्च होऊनही उगवणबाबत वाढत असलेल्या तक्रारीवर रामबाण उपाय काढण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे अखेर चीज झाले आहे. या अनोख्या उपक्रमामुळे महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांचा सत्कारही केला आहे.

नेमकं कृषीसहायक जाधव यांनी काय केले..?

कापूसतळणी हे मध्यम स्वरुपाचे गाव आहे. येथील शेतकऱ्यांना दरवर्षी विकतेचे बियाणे घेऊन पेरणी करावी लागत होती. असे असतानाही बियाणांची उगवणच झाली नाही अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मारुती जाधव यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळेच त्यांनी एक योजना आखली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा एक गट तयार केला. या शेतकऱ्यांकडून 2020 च्या खरीप हंगामातील 400 क्विंटल सोयाबीन गोळा केले आणि त्याची बीज उगवण क्षमता तपासून त्याच्या 30 किलोच्या बॅग केल्या. एवढेच नाही 2021 च्या हंगामात बाजारभावापेक्षा कमी दराने त्या शेतकऱ्यांना विकल्या. यामुळे शेतकऱ्यांची वेळ, वाहतूकीचा खर्च आणि कमी दरात चांगले बियाणे मिळाल्याने उत्पादनात वाढ झाली.

लोकप्रतिनीधींचाही पुढाकार

मारुती जाधव यांनी ही कल्पना गावच्या सरपंच अक्षता खडसे यांच्या मांडली. यामध्ये वेगळेपण असल्याने अनेकांनी विचार करुन जाधव यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा गट निर्माण होऊन सोयाबीनची उगवण क्षमता ही तपासणी करणे शक्य झाले. यामुळे गावातील शेतकऱ्यांचे 80 ते 90 लाखांची बचत झाली आहे. 30-30 किलो वजनाच्या बॅग खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीच अडचण आली नाही तर यामुळे उत्पादकताही वाढली असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते जाधव यांचा सत्कार

कृषी सहायकाची जबाबदारी खऱ्या अर्थाने जाधव यांनी पार पाडलेली आहे. शेतकऱ्याची अडचण सोडवूण त्यांना योग्य मदत हाच या पदाचा खरा अर्थ आहे. पदाला शोभेल असेच कार्य कृषी सहायक मारुती जाधव यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Rate: पांढर सोनं अजूनही घरातच, दरावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम, काय आहे सल्ला?

Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर

Banana : हमी पीक झाले बेभरवश्याचे, केळीवर कीडीचा प्रादुर्भाव अन् विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.