Kharif Season: खत, बियाणे खरेदी करताना ही घ्या काळजी, अन्यथा तेलही गेले अन्….

उद्या पेरणी म्हणताच शेतकरी आज बियाणे खरेदीला जातात. घाईगडबडीत सेवा चालक देतील ते बियाणे आणि देतील तीच पावती घेऊन ते परतीची वाट धरतात. मात्र, शेतकऱ्यांची येथेच मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.

Kharif Season: खत, बियाणे खरेदी करताना ही घ्या काळजी, अन्यथा तेलही गेले अन्....
बियाणे
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 3:00 PM

लातूर : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. (Kharif Season) खरिपगूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत ते (Kharif Sowing) चाढ्यावर मूठ ठेवण्याची. मात्र, उत्पादन वाढीसाठी आणि पेरलेलं उगवण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरवातीपासूनच सतर्क असणे गरजेचे आहे. त्यामुळे खत, बी-बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरवर्षी पेरणी नंतर उगवलेच नाही किंवा उगवले तर फळधारणा झालीच नाही अशा एक ना अनेक तक्रारी (Agricultural Department) कृषी विभागाकडे दाखल होतात. पण खत, बियाणांची खरेदी करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कृषी विभागालाही कारवाई करता येत नाही त्यामुळे सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी सतर्क राहिले तर त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाचे काय अवाहन आहे याचा प्रत्येक शेतकऱ्यांने अवलंब करणे गरजेचे आहे.

खत, बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

उद्या पेरणी म्हणताच शेतकरी आज बियाणे खरेदीला जातात. घाईगडबडीत सेवा चालक देतील ते बियाणे आणि देतील तीच पावती घेऊन ते परतीची वाट धरतात. मात्र, शेतकऱ्यांची येथेच मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात.

अन्यथा कारवाईत अडचणी

खरीप हंगामात बनावट बियाणे अथवा औषधे, खते ही ज्यादा दराने विक्री करणाऱ्यांवर तालुका स्तरावर भरारी पथकांची नेमणूक केलेली असते. अडचण किंवा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी या पथकाशी संपर्क साधणे तेवढेच गरजेचे आहे. शिवाय शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर कृषी विभागातील अधिकाऱ्यांना रीतसर पावतीचा आधार घेता येतो. त्याशिवाय कारवाई करण्यासही अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेतली तर कारवाईतून भरपाई मिळण्यास मदत होते पण रीतसर पावती नसल्यास बियाणांचे पैसे तर नाहीच पण झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण हे देखील ठरविता येत नाही.

हे सुद्धा वाचा

गुणवत्तापूर्ण बियाणांसाठी समितीची स्थापना

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळावे म्हणून कृषी विभागाचाही रोल महत्वाचा आहे. बाजारपेठेत दाखल होणाऱ्या बी-बियाणांची पाहणी करणे, योग्य प्रकारे त्याचा पुरवठा होतो की नाही याची दक्षता घेणे आदी जबाबदारी ही याच विभागाकडे असते. याकरिता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके ही गुणवत्तापूर्ण मिळावीत यासाठी या समित्यांची स्थापना केली जाते.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.