Cotton : कापसाचे उत्पादन घ्या, पण फरदडमुळे होणारे नुकसान टाळा, ‘फरदड मुक्त गाव’ मोहिमेत कृषी विभाग बांधावर
गेल्या 10 वर्षात झाले नाही ते यंदा कापूस दराबाबत घडले आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली ती अंतिम टप्प्यापर्यंत कायम होती. घटत्या उत्पादनामुळे यंदा 12 हजार रुपये क्विंटलपर्यंत कापसाचे दर गेले होते. जिल्ह्यातील मालेगव, नांदगाव, सटाणा आणि येवला या भागात 34 हजार हेक्टरावर कापासाची लागवड झाली होती. यामुळे यंदाच्या खरिपात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे. पण त्यापूर्वीच कृषी विभागाने गावे ही फरदड मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.
नाशिक : गेल्या 10 वर्षात झाले नाही ते यंदा (Cotton Rate) कापूस दराबाबत घडले आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली ती अंतिम टप्प्यापर्यंत कायम होती. घटत्या उत्पादनामुळे यंदा 12 हजार रुपये क्विंटलपर्यंत कापसाचे दर गेले होते. जिल्ह्यातील मालेगव, नांदगाव, सटाणा आणि येवला या भागात 34 हजार हेक्टरावर कापासाची लागवड झाली होती. यामुळे यंदाच्या (Kharif Season) खरिपात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे. पण त्यापूर्वीच (Agricultural Department) कृषी विभागाने गावे ही फरदड मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. कापूस उत्पादक गावांत फरदड मुक्त गाव अशी ही संकल्पना असून शेतकऱ्यांनी याची अंमलबजावणी करावी यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. फरदडमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे.
काय आहे उद्देश?
शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी कापूस वेचणी झाल्यावर फरदड कापसाची जोपासणा करतात. यामुळे कापसाचे थोड्याबहुत प्रमाणात उत्पादन मिळते पण याच फरदडमुळे शेतजमिनीचे तर नुकसान होतेच पण बोंडअळीमुळे इतर पिकांवरही त्याचा परिणाम होतो. फरदड कापूस तात्पुरत्या स्वरुपासाठी चांगला असला तरी त्यामधून अधिकचे नुकसानच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यापासून कसे नुकसान होते हे पटवून देण्याचा कृषी विभागाचा संकल्प आहे. अधिकच्या उत्पादनापेक्षा शेतजमिनीचे आरोग्यही किती महत्वाचे आहे हे पटवून दिले जाणार आहे.
असा टाळा बोंडअळीचा प्रादुर्भाव
यंदा कापूस हंगाम लांबल्याने त्यावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव हा आता खरिपातील पिकांवर होण्याचा धोका आहे. कापूस पिकाचे अवशेष शेतामध्ये राहिल्याने किडीचा जीवनक्रम हा सुरुच असतो. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही धोका आहेच. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करुन कापूस पिकाची पूर्वहंगामातील म्हणजेच मे महिन्यातील लागवड टाळावी लागणार आहे. 5 ते 6 महिने शेत हे पीकविरहीत असल्यास बोंडअळी ही सुप्ताअवस्थेत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन घेणे टाळावे असा सल्ला दिला जाणार आहे.
असे करा फरदडचे नियोजन..
कापूस वेचणी झाल्यावर कापसाच्या पऱ्हाट्या ह्या वावरात किंवा बांधावर ठेऊ नयेत. पऱ्हाट्या ह्या रोटाव्हेटरने जमिनीत गाडाव्यात किंवा जाळाव्यात. कापसाची वेचणी झाल्यावर हंगामाच्या शेवटी या शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. शिवाय कापासाच्या वेगवेगळ्या वाणाची लागवड करण्यापेक्षा गावनिहाय एकच वाण वापरले तर बोंडअळीचा धोका राहणार नसल्याचे कृषी उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Weather Update : राज्यात ऊन-पावसाचा खेळ, आणखी पाच दिवस धोक्याचेच…! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
Kharif Season : खरिपातील सोयाबीन बियाणाची चिंता मिटली, उन्हाळी बिजोत्पादन मात्र संकटात