Weather Alert | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता
हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. Heat Wave
रत्नागिरी: हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ होवू शकते अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. (Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)
नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन
ऋतू बदल आणि उष्णता वाढ याचा आरोग्याला फटका बसण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं अवाहन हवामान खात्यानं केलंय. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या पुढे गेलाय. सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकरांना उन्हाचे चटके बसतायत. वाढलेल्या तापमानामुळे रत्नागिरीकर हैराण झालेत.
वाढलेल्या तापमानाचा आंब्याला फटका
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आंब्याची मोठी गळ होतेय. त्यामुळे बागायतदार सुद्धा चिंतेत सापडलेत. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेत. त्यामुळे सथ्या शितपेयांवर रत्नागिरीकरांनी आपला मोर्चा वळवलाय. विविध शितपेयांच्या ठिकाणी रत्नागिरीकरांची गर्दी पहायला मिळते. रत्नागिरीतील वाढत चाललेल्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
वातावरणातील अनियमिततेमध्येही 792 डझन आंबा निर्यात
वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून 792 डझन आंबा कतार आणि इंग्लंडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरुवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा मिळालाय. रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात करण्यासाठी कोरोना काळात निर्यातीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. आंबा प्रकिया झाल्यानंतर पॅकिग करून वातानुकुलीत व्हॅनमधून हा आंबा मुंबईला पाठवण्यात आला.
भांडूप आगप्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची मागितली माफीhttps://t.co/9RGbcHlXnU#CMUddhavThackeray | #BhandupFire | #dreamsmall | #hemantnagrale | #mumbai | #fireinmumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या
Weather Alert : दिल्लीसह देशभरात थंडीचा कहर, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)
(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)