Pm Kisan Scheme : 11 वा हप्ता जमा झाला नाही, चिंता सोडा अन् कामाला लागा..!

पीएम किसान योजना ही 2018 साली सुरु झाली असून या योजनेतील 11 हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शिवाय उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच हा निधी जमा होणार आहे. मात्र, देशभरातील 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.

Pm Kisan Scheme : 11 वा हप्ता जमा झाला नाही, चिंता सोडा अन् कामाला लागा..!
PM kisan yojnaImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 4:41 PM

मुंबई :  (Central Government) मोदी सरकारने ठरल्याप्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी औपचारिकरित्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील रक्कम अदा केली आहे. ऐन (Kharif Season) खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट असले तरी ज्यांना रकमेचा लाभ मिळाला नाही त्यांच्या मनात धास्ती कायम आहे. पण लाभार्थी असूनही निधी खात्यामध्ये वर्ग झाला नसेल तर त्या शेतकऱ्यांना चिंता करण्याचे काम नाही. कारण अशा शेतकऱ्यांसाठीही मोदी सरकारने एक पर्याय खुला ठेवला आहे. केंद्र सरकारने यासाठी एक हेल्पलाईन सुरु केली असून या हेल्पलाईनवर केवळ पीएम किसान योजनेशी संबंधित समस्या सोडविण़्यासाठी ही हेल्पलाईन वापरली जाणार आहे.

हेल्पलाईनचा असा करा उपयोग

ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही तर 011-24300606 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येणार आहे. एवढेच नाही तर अजून हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईटचाही पर्याय शेतकऱ्यांसाठी असणार आहे. पीएम किसान हेल्पलाइन नंबर: 155261 असा असून ई-मेल आय़डी pmkisan-ict@gov.in हा राहणर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे तीन पर्याय खुले राहणार आहेत.

10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा

पीएम किसान योजना ही 2018 साली सुरु झाली असून या योजनेतील 11 हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शिवाय उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच हा निधी जमा होणार आहे. मात्र, देशभरातील 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळतात. 11 हप्ता ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

हे सुद्धा वाचा

शेवटच्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ

शिमला येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 10 कोटी 50 लाथ शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेची रक्कम जमा करुन शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले तर प्रत्येक गरिबाला योजनेचा लाभ मिळवून देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या माध्यमामुळे भ्रष्टाचार कमी झाला असून आज जनधनची खाते, जनधन आधार ही सर्व खाते मोबाईलच्या माध्यमातून हातळता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.