Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार

PM Kisan Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.

PM Kisan Scheme : खात्यात नाही जमा झाली रक्कम, शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:27 PM

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2,000 रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो. शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा करण्यात येतात. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार (PM-KISAN Scheme Complaint Number) दाखल करता येते.

वर्ष 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना सुरु केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यात ही रक्कम वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात आले आहे. 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. रक्कम जमा झाली नसल्यास तक्रार दाखल करता येते.

खात्यात रक्कम आली की नाही असे तपासा

हे सुद्धा वाचा
  1. पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) तुमच्या खात्यात जमा झाला असेल.
  2. त्याचा पडताळा घेण्यासाठी यासंबंधीची अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जा.
  3. त्याठिकाणी ‘Farmers Corner’ वर क्लिक करा.
  4. Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
  5. लाभार्थ्याचा आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक हा तपशील द्यावा लागेल.
  6. ‘Get Data’ वर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी हप्त्यासंदर्भातील सद्यस्थितीत दिसेल.

अशी करा तक्रार

  1. 13 वा हप्ता जमा झाला नाही तर त्याविषयीची तक्रार करता येते.
  2. सर्वात अगोदर कृषी अधिकारी, लेखापाल यांच्याकडे चौकशी करा.
  3. खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना सांगा.
  4. त्यांच्याकडे तक्रार करुनही समाधान न झाल्यास पीएम-किसान हेल्प डेस्ककडे तक्रार करा.
  5. pmkisan-ict@gov.in या ईमेलवर तक्रार पाठविता येईल.
  6. पीएम-किसान हेल्प डेस्कच्या 011-23381092 (Direct HelpLine) वर फोन करा.

कृषी मंत्रालयाचे हेल्पलाईन क्रमांक

  1. पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  2. पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक :155261
  3. पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011—23381092, 23382401
  4. पीएम किसान नवीन हेल्पलाइन : 011-24300606
  5. पीएम किसान अजून एक हेल्पलाइन क्रमांक : 0120-6025109

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.