पीएम किसानचा हप्ता झाला जमा, या सोप्या पद्धतीने तपासा
PM Kisan | अखेर शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली. त्यांच्या खात्यात नोव्हेंबरच्या मध्यातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला. पण अनेक शेतकऱ्यांना अद्याप ही वार्ता कानी नाही. खात्यात रक्कम झाली की नाही हे तपासण्यासाठी ही सोपी पद्धत वापरल्यास त्यांना यासंबंधीची माहिती लगेच कळेल.
नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड झाली. नोव्हेंबरच्या शेवटी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यात वर्तविण्यात येत होती. पण केंद्र सरकारने दिवाळीचा मुहूर्त साधला. शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल 15 नोव्हेंबर रोजी झारखंड दौऱ्यावर असताना त्यांनी मंजूरी दिली. हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला. पीएम किसान योजनेतंर्गत देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
तीन हप्त्यात आर्थिक मदत
यापूर्वी केंद्र सरकारने या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर असल्याचे दिसून येते. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा करण्यात येतात. यापूर्वी DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.
लाभार्थ्यांचे असे तपासा नाव
लवकरच 15 वा हप्ता जमा होणार आहे. या यादीत नाव आहे की नाही ते शेतकऱ्यांनी तपासावे. त्यासाठी pmkisan.gov.in वर लॉगईन करा.या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील द्या. त्यानंतर यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा. योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल
असे तपासा 15 व्या हप्त्याचे स्टेट्स
पीएम-किसानच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. पीएम-किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने लगेचच ई-केवायसी करता येते. शेतकरी त्यांच्या शेजारील CSC केंद्रावर बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसी करु शकतात.
पैसा आला की नाही खात्यात?
- सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
- या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
- या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
- आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
- त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.