व्यापाऱ्यांची मनमानी, मग संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला लिलावाचं मार्केट गेट…
बाजार समितीचा रस्ता खराब असल्याने दुसऱ्या बाजार समितीत माल नेता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) रोष पहायला मिळाला. अखेर मार्केट कमिटीकडून रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले
अहमदनगर : कोपरगाव (Kopargaon) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) भाजीपाला लिलावात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळत नसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापारी मनमानी पद्धतीने लिलाव करत असून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाला कमी भाव आणि व्यापाऱ्यांनी आणलेल्या मालास अधिक भाव दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत घोषणाबाजी केली. मार्केट कमिटीचे गेट बंद करून गेट समोर आपली वाहने आडवी लावत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बाजार समितीचा रस्ता खराब असल्याने दुसऱ्या बाजार समितीत माल नेता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) रोष पहायला मिळाला. अखेर मार्केट कमिटीकडून रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले, तर व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आणि बाजार समितीच्या प्रशासकांमध्ये आज बैठक पार पडणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळत नसल्याने कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र आता कापूस विकण्यासाठी पुन्हा सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. कापूस घरात साठवणूक करून ठेवला असल्याने कापसाची कॉलिटी खराब झाली असून त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठं आर्थिक नुकसान होत चाललं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालो तर कापसाला देखील भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक आव्हान उभे राहिला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन कापसाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक 1 लाख 12 हजार शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशाचा मोठा आधार झाला आहे. जिल्ह्यातील 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असल्यामुळे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या लाभ मिळाला आहे. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबीयांना 2 हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण 6 हजार प्रतिवर्ष लाभ मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या पेरणीसाठी काही प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.