हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय? हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी आवक

उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे पीक पध्दतीमध्ये बदल केला. रब्बी हंगामातील मुख्य पिकांककडे दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला शिवाय कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार ज्वारीला पर्याय म्हणून हरभऱ्याची निवड करण्यात आली होती. त्यामुळे सरासरीच्या दुपटीने यंदा हरभऱ्याच्या पेऱ्यात वाढ झाली होती. सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी सुरु आहे तर बाजारपेठेत आवकही होत आहे.

हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय? हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी आवक
कृषी विभागाच्यावतीने उत्पादकता जाहीर करण्यात आली असून त्यानुसार आता हरभऱ्याची खरेदी होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 4:22 PM

लातूर : उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल केला. (Rabi Season) रब्बी हंगामातील मुख्य पिकांककडे दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला शिवाय कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार ज्वारीला पर्याय म्हणून हरभऱ्याची निवड करण्यात आली होती. त्यामुळे सरासरीच्या दुपटीने यंदा (Chickpea Crop) हरभऱ्याच्या पेऱ्यात वाढ झाली होती. सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी सुरु आहे तर बाजारपेठेत आवकही होत आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद आणि तुरीपेक्षा सध्या हरभऱ्याची आवक अधिकची असून दर मात्र या पिकांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत. 4 हजार 500 ते 5 हजार 300 पर्यंतचा दर मिळत आहे. शिवाय ही तर आवकची सुरवात आहे. त्यामुळे भविष्यात हरभरा दराचे काय होणार याची चिंता उत्पादकांना लागून राहीली आहे.

हंगामाच्या सुरवातीलाच आवक विक्रमी

हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असून गेल्या 15 दिवसांपासून याची आवक सुरु झाली आहे. असे असले तरी सर्वात अधिकची आवक ही हरभऱ्याचीच आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी 30 हजार पोत्यांची आवक झाली होती तर 4 हजार 600 प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा हरभऱ्याचा प्रयोग केला होता. पण सध्या बाजारपेठेतल्या दरावरुन शेतकऱ्यांचा उद्देश साध्य होणार की नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना प्रतिक्षा हमीभाव केंद्राची

तुरीप्रमाणेच हरभरा खरेदीसाठीही हमीभाव केंद्र उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करुन शेतकऱ्यांना हरभऱ्याची विक्री करता येणार आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 चा दर असला तरी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर हा ठरवून देण्यात आला आहे. 15 मार्चपासून प्रत्यक्ष हरभरा खरेदीला सुरवात होणार आहे. त्यामुळे या हमीभावाचा का होईना शेतकऱ्यांना फायदा होईल असा आशावाद आहे.

व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार

तुरीप्रमाणेच सध्या रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची अवस्था आहे. कारण तूर खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वी 6 हजारापेक्षा तुरीला दर होता. तर हमी भाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये ठरवून देण्यात आला होता. हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेतीलही दर वाढले होते. आता तीच अवस्था सोयाबीनची होऊ नये. मात्र, विक्रमी पेरा वाढल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिकची आवक होणार असून यंदा हरभरा उत्पादकांना हमीभाव खरेदी केंद्राचाच अधार घ्यावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Grain Sieve : धान्य चाळणी एक कामे अनेक, शेतीमालाची प्रतवारी अन् योग्य दरही

Poultry : पोल्ट्री फार्मर्सचे थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र..! पत्रास कारण की,

युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.