Rabbi Season : रब्बी हंगामातही तेलबियांचे क्षेत्र वाढले, मुख्य पिकांना शेतकऱ्यांनी डावलले
पारंपरिक पिकांना बाजूला सारत आता शेतकरी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. गेल्या खरीप हंगामापासून हे चित्र बदलले आहे. तेलबियांचे उत्पादन हे तसे खरिपात घेतले जाते. मात्र, आता पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न मिळेल त्यावरच अधिकचा भर दिला जात आहे. सध्या रब्बी हंगामातील पेरणीचा अहवाल कृषी विभागाने सादर केलेला आहे.
मुंबई : पारंपरिक पिकांना बाजूला सारत आता शेतकरी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. गेल्या खरीप हंगामापासून हे चित्र बदलले आहे. तेलबियांचे उत्पादन हे तसे खरिपात घेतले जाते. मात्र, आता (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न मिळेल त्यावरच अधिकचा भर दिला जात आहे. सध्या रब्बी हंगामातील पेरणीचा अहवाल (Agricultural Department) कृषी विभागाने सादर केलेला आहे. यामध्ये मुख्य पीक असलेल्या गव्हाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी तेलबियांच्या पेऱ्यात वाढ केली आहे. त्यामुळेच यंदा 1 कोटी 3 लाख हेक्टरावर (Oilseeds) तेलबियांचा पेरा झाला आहे तर सर्वाधिक वाढ ही मोहरीमध्ये झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत गव्हाच्या क्षेत्रात घट झाली आहे. शिवाय काही राज्यांमध्ये सरकारच्या धोरणामुळे भातक्षेत्रामध्येही घट झाली आहे. या सर्वामध्ये धान्याच्या शेती क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाने जाहीर केले्ल्या आकडेवारीनुसार देशात 3 कोटी 43 लाख 26 हजार क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 कोटी 84 लाख हेक्टरने क्षेत्र हे घटले आहे. सरासरीपेक्षा हा पेरा कमी असून शेतकऱ्यांचा कल हा नगदी पिकांकडे असल्याचे समोर आले आहे.
तेलबियांच्या क्षेत्रात 19 लाख 10 हजार हेक्टराने वाढ
यंदा तेलबियांच्या उत्पादनात वाढ ही प्रकर्षाने जाणवणार आहे. कारण तब्बल 19 लाख हेक्टराने वाढ यामध्ये झाली आहे. भारत सरकारच्या धोरणांमुळे आणि गेल्या वर्षी मोहरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. आकडेवारीवरुन तेलबियांचे क्षेत्र 19 लाख 10 हजार हेक्टरने वाढून 102.79 लाख हेक्टरवर गेल्याचे आढळून येते. गेल्या वर्षी याच कालावधीत या पिकांचे क्षेत्र 83 लाख 69 हजार हेक्टर होते. तेलबिया पिकांमध्ये सर्वाधिक वाढ मोहरीच्या क्षेत्रात झाली आहे. गेल्या वर्षीच्या 73 लाख 12 हजारच्या तुलनेत यंदा हे प्रमाण वाढून 91 लाख 63 हजार हेक्टरवर पोहोचले आहे. उर्वरित तेलबिया पिकांचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी-अधिक प्रमाणात आहे.
गेल्या वर्षी मोहरीचा दर 4 हजार 650 प्रतिक्विंटल हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कितीतरी जास्त होता. यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात त्याची विक्री केली. तेलबियांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारने यावेळी मोहरीच्या एमएसपीत 400 रुपयांची वाढ केली आहे. आगामी हंगामासाठी मोहरीची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 5 हजार 50 रुपये आहे. यावेळीही एमएसपीपेक्षा मोहरीचे भाव चढेच राहतील, अशी आशा शेतकऱ्यांबरोबरच सरकारलाही आहे.
डाळींच्या पेऱ्यातही वाढच
कडधान्य पिकांच्या क्षेत्रातही थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या 2 लाख हेक्टरने डाळींचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, चण्याच्या क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. उर्वरित कडधान्य पिकांचे क्षेत्र गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. यंदा पौष्टिक भरडधान्य व भाताच्या क्षेत्रात घट झाली आहे. भातशेतीमध्ये अतिजल वापरले जाते आणि त्याचा पर्यावरणावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत धानाचे क्षेत्र कमी होणे ही एक आनंदाची बातमी आहे. मात्र, सरकारने प्रयत्न करूनही पोषक खुरड धान्याच्या क्षेत्रात वाढ झालेली नाही. मका आणि जवसाच्या केवळ एकरीत थोडी वाढ होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :
Papaya : पपईची लागवड साधली की उत्पन्नाची हमी, काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?
Crop Insurance : पीकविम्याबाबत राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा?
Soybean Rate : दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर स्थिरावलेलेच, आता शेतकऱ्यांकडे एकच पर्याय..!