ज्वारीचे क्षेत्र तर घटले, आता भौगोलिक मानांकन टिकवून ठेवण्याचे ‘टार्गेट’..! काय आहेत मालदांडी ज्वारीची वेगळेपण?

उत्पादन खर्चात झालेली वाढ, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेत मिळत असलेला दर यामुळे शेतकरी नगदी पिकांकडेच आकर्षित होत आहे. यंदाच्या हंगामातही हरभऱ्याचे क्षेत्र तर वाढले आहेच पण करडई, सुर्यफूल यासारख्या तेलबियांवर शेतकऱ्यांचा भर आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मालदांडी या ज्वारीला 2016 मध्ये केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन प्रदान केलेले आहे. त्यानंतर प्रक्रिया उद्योग उभारुन एक नवी ओळख निर्माण करणे गरजेचे होते.

ज्वारीचे क्षेत्र तर घटले, आता भौगोलिक मानांकन टिकवून ठेवण्याचे 'टार्गेट'..! काय आहेत मालदांडी ज्वारीची वेगळेपण?
रब्बी हंगामात मुख्य कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र हे घटले आहे
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:35 AM

सोलापूर : बदलत्या परस्थितीमुळे यंदा (Jowar Area) ज्वारीचे क्षेत्र तर घटले आहे पण राज्याचे ज्वारीचे कोठार असलेल्या (Solapur District) सोलापूरची जिल्ह्याची ओळखही नष्ट होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काळाच्या ओघात उत्पादन खर्चात झालेली वाढ, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेत मिळत असलेला दर यामुळे शेतकरी (Cash Crop) नगदी पिकांकडेच आकर्षित होत आहे. यंदाच्या हंगामातही हरभऱ्याचे क्षेत्र तर वाढले आहेच पण करडई, सुर्यफूल यासारख्या तेलबियांवर शेतकऱ्यांचा भर आहे. जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मालदांडी या ज्वारीला 2016 मध्ये केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन प्रदान केलेले आहे. त्यानंतर प्रक्रिया उद्योग उभारुन एक नवी ओळख निर्माण करणे गरजेचे होते. पण आता घटते क्षेत्र आणि होत असलेले दुर्लक्ष यामुळे आता मालदांडी ज्वारीचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठीच प्रयत्न करणे ही काळाची गरज झाली आहे.

काय आहेत मालदांडी ज्वारीची वैशिष्ट्ये?

टपोरे दाणे आणि पांढरी शुभ्र असणाऱ्या या मालदांडीला देशभरातून मागणी आहे. आजच्या आहारात भाकरी कमी झाली असली तरी मालदांडीचे महत्व हे टिकून आहे. यामध्ये ग्लुकोजची मात्रा असल्याने ही गोड असते इतर धान्यांच्या तुलनेत या ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज पदार्थ याचे प्रमाण अधिक असल्याने खाण्यासाठी ही ज्वारी उत्तम मानली जाते. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी जेवणात ज्वारीचे महत्व आहे.

यामुळे निर्माण होत आहेत अडचणी

मालदांडी ज्वारीचे वेगळेपण असले तरी बाजार मुल्य हे कधी वाढलेच नाही. शिवाय उत्पादन खर्च मात्र वाढत गेला आहे. शिवाय आता हिरव्याचाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी मालदांडीचे उत्पादन बरोबरच जनावरांना चारा म्हणून कडबा उपयोगी पडत होता. कडब्याचीही मागणी ही घटलेली आहे. दरम्यानच्या काळात ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज होती पण याकडे प्रशासनाचे आणि येथील लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे क्षेत्र तर घटत आहे पण भौगोलिक मानांकनाचे वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी तरी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मुख्य कोठारामध्ये घटले क्षेत्र

केवळ मराठावड्यातच नाही तर सबंध राज्यात ज्वारीचे क्षेत्र घटलेले आहे. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीला 31 मार्च 2016 रोजी केंद्र सरकारकडून भौगोलिक मानांकन हे प्राप्त झाले होते. त्यामुळे मंगळवेढ्याच्या ज्वारीला राज्यभरातून मागणी आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापेक्षा दुपटीने मालदांडीचा पेरा होत असत पण गतवर्षीपासून क्षेत्र हे घटू लागले आहे. गतवर्षी 43 हजार हेक्टरावर तर यंदा केवळ 28 हजार 899 हेक्टरावर पेरा झाला आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्याचा उपयोग होणार का हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?

Banana Rate : अवकाळी, कडाक्याच्या थंडी नंतरही केळीचा गोडवा कायम, 15 दिवसांमध्ये दर दुप्पट होण्याचे काय कारण?

काय सांगता? दोन वर्षात 14 हजार कांदाचाळींचे नियोजन, असा घ्या अनुदानाचा लाभ अन् कांद्याचे संरक्षण करा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.