Latur Market : हरभऱ्याची आवकही वाढली अन् दरही, शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनवरच
उन्हाळी हंगामातील हरभरा आणि खरिपातील सोयाबीन व तुरीच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. याच बरोबर हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. मध्यंतरी सलग पाच दिवस बाजार समितीमधील व्यवहार हे बंद राहिल्यानंतर दराचे काय होणार याचे वेध शेतकऱ्यांना लागले होते. त्यामुळेच दोन दिवसांपासून शेतीमालाची आवक ही वाढत आहे. लातूरच नव्हे सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये हरभरा आणि सोयाबीनची आवक ही वाढलेली आहे. तर दरातही थोड्या बहुत प्रमाणात सुधारणा झाली आहे.
लातूर : उन्हाळी हंगामातील हरभरा आणि खरिपातील सोयाबीन व तुरीच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. याच बरोबर (Chickpea Crop) हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. मध्यंतरी सलग पाच दिवस बाजार समितीमधील व्यवहार हे बंद राहिल्यानंतर दराचे काय होणार याचे वेध शेतकऱ्यांना लागले होते. त्यामुळेच दोन दिवसांपासून शेतीमालाची आवक ही वाढत आहे. (Latur Market) लातूरच नव्हे सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये हरभरा आणि (Soybean Arrival) सोयाबीनची आवक ही वाढलेली आहे. तर दरातही थोड्या बहुत प्रमाणात सुधारणा झाली आहे. हरभऱ्याचे दर 4 हजार 757 तर सोयबीन हे 7 हजार 200 वरुन आता 7 हजार 280 वर येऊन ठेपले आहे. हरभरा दरात 50 ते 100 रुपायांची सुधारणा ही झाली आहे. शिवाय आवक वाढली असताना दरात वाढ होत आहे हे विशेष. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तुरीची आवक सुरु आहे.
सोयाबीनची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची अडचण
सोयाबीनला अधिकचा दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवले होते. शिवाय घटत्या उत्पादनामुळे सोयाबीनच्या दरात वाढही झाली पण शेतकऱ्यांना कायम वाढीव दराची अपेक्षा राहिलेले आहे. मध्यंतरी सोयाबीनचे दर हे 7 हजार 600 पर्यंत गेले असताना अनेकांनी विक्री केले पण आता दर घसरल्याने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे.
राज्यानिहाय हरभऱ्याच्या दरात तफावत
महाराष्ट्रात हरभरा दरात सुधारणा झाली असली तरी मध्यप्रदेशमध्ये दर हे काही प्रमाणात घसरले आहेत. देशभरात हरभऱ्याला या आठवड्यात 4 हजार 700 ते 5 हजार 100 असे दर मिळाले आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सरासरी 4 हजार 775 असा दर मिळाला आहे. त्यामुळे आवक वाढती असतानाही दर वाढत ही समाधानाची बाब आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाक्यात हऱभरा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हरभऱ्याची आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची
आतापर्यंत शेतकऱ्यांनी जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत केले तेच आता हरभऱ्याच्या बाबतीत करणे महत्वाचे आहे. सध्याचे वाढते दर पाहता मागणीपेक्षा अधिकची आवक झाली तर मात्र, दरावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तरच दर हे टिकून राहणार आहेत. सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर, हरभरा आणि सोयाबीनची आवक होत आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी सर्वप्रथम केली. आता थेट विक्रीपेक्षा बाजारपेठेचा अभ्यास करुनच शेतकऱ्यांनी निर्णय घेणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या :
Drone Farming : ड्रोन शेतीमध्ये सुविधांपेक्षा अडचणी अधिक, शेतकऱ्यांसमोर काय आहेत अडचणी?
Onion Rate: कांदा दारचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर, 3 एकरावरील उभ्या पिकावर फिरवला नांगर
‘पीएम किसान’ योजनेतील हे बदल माहिती आहेत का?… जाणून घ्या आवश्यक बाबी…