Rabi Season : वातावरण निवळले आता सुगी जोमात, मजूर टंचाईवर शेतकऱ्यांचा ‘हा’ रामबाण उपाय..!
निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय यंदा भर उन्हाळ्यातही येत आहे. सध्याच्या सुगीच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होण्याचे सोडून ढगाळ वातावरण अन् पावसाच्या सरी अनुभवयास मिळत आहेत. अवकाळीचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात अधिकचा झाला आहे. मात्र, काही भागांमध्ये केवळ ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी वातावरण निवाळल्याने पुन्हा रब्बी पिकांच्या काढणीची लगबग सुरु झाली आहे. काढणीला आलेले हरभरा, गहू, ज्वारी हे पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी दिवस उजाडताच शेत जवळ करीत आहे.
वाशिम : निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय यंदा भर उन्हाळ्यातही येत आहे. सध्याच्या सुगीच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होण्याचे सोडून ढगाळ वातावरण अन् पावसाच्या सरी अनुभवयास मिळत आहेत. अवकाळीचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात अधिकचा झाला आहे. मात्र, काही भागांमध्ये केवळ (Cloudy Weather) ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी वातावरण निवाळल्याने पुन्हा (Rabi Crop) रब्बी पिकांच्या काढणीची लगबग सुरु झाली आहे. काढणीला आलेले हरभरा, गहू, ज्वारी हे पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी दिवस उजाडताच शेत जवळ करीत आहे. (Untimely Rain) निसर्गाचा लहरीपणा त्यातच सुगी करण्यासाठी मजूरांची टंचाई निर्माण होत असल्याने शेतकऱ्याचं अख्ख्य कुटुंब पीक काढणी कामात व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात पाहवयास मिळत आहे. पुन्हा निसर्गाचा अवकाळीचा धोका निर्माण होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करुन पीक काढणीला जिल्ह्यामध्ये सुरवात झाली आहे.
हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र
यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभऱ्यावर भर दिला होता. जिल्ह्यात हरभऱ्याचाच अधिकचा पेरा झाला आहे. शिवाय एकाच वेळी गहू, हरभरा आणि आता ज्वारी ही पीके काढणीला आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. मात्र, उन्हामुळे हरभरा तडकत असल्याने सुगीचा श्रीगणेशा हरभऱ्यापासूनच करण्यात आलेला आहे. शिवाय यंदा उत्पादकताही वाढलेली आहे. पोषक वातावरणामुळे सर्वच पिकांचे उत्पादन वाढणार आहे मात्र, सुगी पूर्ण होईपर्यंत पावासाने हजेरी लावू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मजुरी वाढली, शेतकऱ्याचे अख्खं कुटुंब शिवारात
रब्बी हंगामात एकाच वेळी सर्व पिके काढणीला येतात. त्यामुळे कामासाठी मजूर मिळत नाही आणि मिळाले तरी मजुरीमध्ये वाढ झालेली आहे. पुरुषांसाठी 500 तर महिला मजूरांसाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत. एवढे असतानाही वेळेत कामे होत नसल्याने सध्या शेतकऱ्याचं कुटुंबच शेतामध्ये राबताना दिसत आहे. शिवाय पावसाची धास्ती असल्याने कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
काढणी कामे करताना घ्यावयाची काळजी
काढणीला आलेल्या पिकांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. शिवाय काढणी झाली की पीक वावरात न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. सध्या वातावरण निवळले असले तरी हे अवकाळी आहे. रात्रीतूनच सर्व उध्वस्त झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे काढणी झाली पिकाची सुरक्षतता महत्वाची आहे. सध्या हरभरा हे पीक काढणीसाठी आलेले आहे. ज्वारीसाठी अजूनही अवकाश आहे. पीक पाहणी करुन काढणी आणि त्याची सुरक्षा हेच महत्वाचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Red Chilly : पाच वर्षानंतर झोंबणार धर्माबादची लाल मिरची, हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर
राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?