Video : बैलाच्या खांद्यावरील ओझे आता रोलिंग सपोर्टवर, अभियंत्यांनी कशी साधली किमया?

आजही बैलगाडीतून ऊसाची वाहतूक केली जाते. मात्र, ऊस गाडीत भरताना लाकडी घोडा हा जमिनीत रुतला जातो. त्यामुळे बैलावर अधिकचा बार तर पडतोच पण अनेकवेळा अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बैलांचा पाय मुरगळतो तर अनेकवेळा बैल हे जखमीही होतात. या सपोर्टमुळे बैलांच्या खांद्यावरील भार तर कमी होतोच, पण बैलगाडीचे संतुलन होते.

Video : बैलाच्या खांद्यावरील ओझे आता रोलिंग सपोर्टवर, अभियंत्यांनी कशी साधली किमया?
'आरआयटी' मधील विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक पध्दतीने बैलगाडी बनवली आहे.
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:15 PM

सांगली : शेतकरी अन् बैलजोडी म्हटले की समोर येते ते फक्त कष्ट. काळाच्या ओघात कष्टामध्ये फरक पडला असला तरी कोल्हापूर, सांगली भागात आजही ऊस वाहतूकीसाठी बैलजोडीचाच वापर केला जातो. ऊस गाळप हंगामात बैलांच्या खांद्यावर टनाहून अधिकच्या ऊसाचा भार असतो. बैलांचे हे कष्ट पाहून ‘आरआयटी’ मधील  (Engineer Student) विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक पध्दतीने (Bullock cart) बैलगाडी बनवली आहे. त्यामुळे बैलांवर अधिकचे ओझे तर पडणार नाही पण वाहतूक अगदी सहजरित्या होणार आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने ही अनोखी भेट शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या बैलगाडीला (Support for Rolling) रोलिंगचा सपोर्ट दिल्याने ही सर्व किमया झाली आहे. ‘आरआयटी’ मधील अभियंत्यांनी मिळून हा अनोखा उपक्रम साकारला असून याला सारथी असे नाव दिले आहे.

ऊस वाहतूकीसाठी बैलगाडी फायद्याची

गाळप हंगामात राज्यात 200 साखर कारखाने हे सुरु असतात. आता ऊस वाहतूकीसाठी वाहनांचा वापर केला जात असला कारखाना जवळचा ऊस हा बैलगाडीतूनच नेला जातो. याचाच अभ्यास करुन बैलगाडीला रोलिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये बैलाच्या खांद्यावरील झू च्या मधोमध हा रोलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे समसान प्रमाणात भार हा रोलिंगवर पडणार आहे. या सपोर्टचा वापर अधिकतर रित्या ऊस वाहतूकीसाठीच होणार आहे. सध्या सांगली आणि कोल्हापूर भागातच या बैलगाडीची चर्चा आहे. हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर राज्यभर प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका काय आहे फायदा?

आजही बैलगाडीतून ऊसाची वाहतूक केली जाते. मात्र, ऊस गाडीत भरताना लाकडी घोडा हा जमिनीत रुतला जातो. त्यामुळे बैलावर अधिकचा बार तर पडतोच पण अनेकवेळा अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बैलांचा पाय मुरगळतो तर अनेकवेळा बैल हे जखमीही होतात. या सपोर्टमुळे बैलांच्या खांद्यावरील भार तर कमी होतोच, पण बैलगाडीचे संतुलन होते. या बैलगाडीची प्राथमिक चाचणी झाली असून महाविद्यालयातील सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड, ओमकार मिरजकर यांनी ही किमया साधली आहे.

पेटंटसाठी केला जाणार अर्ज

या अत्याधुनिक बैलगाडीचे वेगळेपण कायम राहण्यासाठी पेटंट घेतले जाणार आहे. यासाठी अर्ज केला जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितेल आहे. संशोधन निधीअंतर्गत या प्रकल्पाला 10 हजार रुपये निधी मिळाला आहे. रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्जही करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांना डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर अन्य शिक्षकांचेही अभियंत्यांना मार्गदर्शन राहिलेले आहे. अभियंत्यांना साधलेला हा उपक्रम इस्लामपूरात चर्चेचा विषय झाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.