Pomegranate Garden : केंद्रीय पथकानेच सांगितले डाळिंब बागा नष्ट होण्याची कारणे, शेतकऱ्यांचे नेमके गणित चुकले कुठे?
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर सर्वच पिकांना बसलेला आहे. सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात डाळिंब बागा नष्टच केल्या जात होत्या. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण याचा थेट क्षेत्रावर परिणाम होऊ लागल्याने थेट केंद्रीय पथकानेच मंगळवेढा तालुक्यातील डाळिंबाची पाहणी केली. केवळ शेतकरी म्हणतेत म्हणून नाही तर प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी गोपनीय पध्दतीने पथक दाखल झाले होते.
सोलापूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर सर्वच पिकांना बसलेला आहे. सर्वाधिक नुकसान (Orchard) फळबागांचे झाले असले तरी (Solapur District) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात डाळिंब बागा नष्टच केल्या जात होत्या. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण याचा थेट क्षेत्रावर परिणाम होऊ लागल्याने थेट (Central Team) केंद्रीय पथकानेच मंगळवेढा तालुक्यातील डाळिंबाची पाहणी केली. केवळ शेतकरी म्हणतेत म्हणून नाही तर प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी गोपनीय पध्दतीने पथक दाखल झाले होते. दरम्यान, खोड किडीचा तर प्रादुर्भाव आहेच पण बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना बागांचे व्यवस्थापन करता आले नाही. यामध्येच अधिकचे नुकसान हे झाले आहे. नवी दिल्ली येथील पथकाने मंगळवेढा परिसरातील धर्मागाव रस्त्यावरील डाळिंबाच्या बागांची पाहणी करुन मदतीच्या अनुशंगाने अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावयाची याबाबत मार्गदर्शनही केले आहे.
खोड किड बागांमध्येच पण अधिकच्या पावसामुळे झाले नुकसान
तेल्या रोगावर तर अद्यापर्यंत प्रभावी औषेधच नाही. तर दुसरीकडे खोड कीड ही वर्षभर डाळिंबाच्या बागेतच सक्रिय असते. मात्र, यंदा अधिकचा पाऊस झाल्याने या कीडीचा प्रादुर्भाव अधिक झाला. शिवाय सातत्याने बदलत असलेल्या वातारणामुळे शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापनही करता आले नाही. कीड रोग नियंत्रण व त्याचे व्यवस्थापन हे वेळेत न झाल्याने खोडकीडीची वाढ होण्यास पोषक वातावरण झाले अन् त्याचा उत्पादनावर पर्यायाने बागांवरदेखील परिणाम झाला असल्याचे पथकातील सहसंचालक डॉ. किरण दशेकर यांनी सांगितले.
किडीचा बंदोबस्त करण्यासाठी काय आहे उपाययोजना ?
वातावरणातील बदलामुळेच डाळिंबावर किडीचा प्रादुर्भाव हा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति लिटर पाण्यात इमामेक्टीन बेंजोएट 2 ग्रम, प्रोपिकॉननाझोल 2 मिली एकत्र मिसळून फवारणी करावी लागणार आहे. बहार धरण्यापूर्वी जमिनीपासून दोन फुटांपर्यंत खोडांसह फांदीवर 10 लिटर पाण्यामध्ये लाल माती चार किलो,इमामेक्टीन बेंजोएट 20 मिली, कॉपर ऑक्सिकलोराईड 25 ग्रॅम एकत्रित करुन खोडाला लेप द्यावा लागणार आहे. तसेच 10 टक्के बोर्डो मिश्रणाचा लेप आलटून-पालटून वापरण्याचा सल्ला कीटक शास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र देवरमनी यांनी दिला आहे.
केंद्रीय पथकाच्या दौऱ्याचे फलीत काय?
सोलापूर जिल्ह्यात सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांमध्ये डाळिंबाचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाने थेट बांधावर जाऊन डाळिंब बागांची पाहणी केली आहे. शिवाय नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असून भरपाईबाबत आश्वासनही दिले आहे.
संबंधित बातम्या :
Organic Farming : केंद्राच्या सूचना अन् वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांची अंमलबजावणी, केवळ सल्लाच नाही तर…