Kharif Season : पहिल्या पेऱ्यातील पिके धोक्यात, धुळ्यातील शेतकऱ्यांवर दुबारचे संकट
गतवर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात देखील पाणीसाठा होता. त्या जोारावरच रब्बी हंगामातील पिके बहरली होती. यामुळे कधी नव्हे तर उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले होते. पण आता भर पावसाळ्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर मका,भुईमुग,कांदा या पाण्यावर येणाऱ्या पिकांना देखील पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
धुळे : जून महिना अंतिम टप्प्यात असतानाही जिल्ह्यात सर्वत्र (Kharif Season) खरीप पेरण्या झालेल्या नाहीत आणि क्षेत्रावर (Cereals) कडधान्याचा पेरा झाला आहे ती पिकेही धोक्यात आली आहेत.शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावल्याने नेमके खरिपाचे चित्र काय राहणार याबाबत साशंका उपस्थित होत आहे. खरिपाच्या तोंडावर जिल्ह्यात झालेल्या अल्प (Rain) पावसाच्या जोरावर कडधान्याचा पेरा झाला होता. यामध्ये मुग, उडदाचा समावेश होता. आता पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत गाढलेल्या बियाणे उगवलेच नाही तर अधिकतर क्षेत्रावर पेरण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पेरण्या होतील का नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
जलस्त्रोतांनीही गाठला तळ
गतवर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात देखील पाणीसाठा होता. त्या जोारावरच रब्बी हंगामातील पिके बहरली होती. यामुळे कधी नव्हे तर उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले होते. पण आता भर पावसाळ्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर मका,भुईमुग,कांदा या पाण्यावर येणाऱ्या पिकांना देखील पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री गारवा अशी परस्थिती सध्या जिल्ह्यात असल्याने खरिपाचे भवितव्य काय असा सवाल उपस्थित झाला आहे.
मशागत करुन फायदा काय?
उत्पादन वाढवण्यासाठी खरीप हंगामात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे केली जातात. यामध्ये नांगरण, मोगडणे आणि कोळपणी याचा समावेश असतो. पण यंदा जून महिना अंतिम टप्प्यात असतानाही मशागतीची कामे झालेली नाहीत. पाऊस नसल्यामुळे शेतीची नांगरटी करून सुद्धा शेती पडून आहेत. मशागत करायची म्हटलं तर शेतातील नांगरलेली ढेकळे फुटत नाहीत त्यामुळे मशागत करून तरी काय फायदा ? पावसाने हजेरी लावली तर पेरणीपू्र्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.शिवाय पावसाने ढेकळे भिजल्यानंतर ते फुटतील म्हणून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सर्वकाही पणाला लागले आहे.
शेत जमिनीतील ओल गायब
शेत जमिनीत ओल असली तर गाढलेल्या बियाणांची उगवण होणार आहे. पण सध्याच्या उघडीपीमुळे पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल देखील जमिनीत राहिलेली नाही. त्यामुळे पेरण्या लांबणीवर तर पडल्या आहेतच पण खरिपाचे भवितव्य काय असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरा झाला होता. मात्र, यंदा जे पेरले तेच उगवले नाही त्यामुळे उत्पादनाचे तर सोडाच पण खरिपाचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.