Agricultural Pump : राज्य सरकारचा निर्णय अन् स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, रब्बी पिकांना मिळणार का संजीवनी?

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने सबंध राज्यभर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्यात आला होता. शिवाय विरोधकांच्या रेट्यामुळे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास तात्पूरती स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेशच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्याने आता स्थानिक पातळीवर निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे.

Agricultural Pump : राज्य सरकारचा निर्णय अन् स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, रब्बी पिकांना मिळणार का संजीवनी?
कृषीपंप
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 11:33 AM

नांदेड : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने सबंध (Maharashtra) राज्यभर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्यात आला होता. शिवाय विरोधकांच्या रेट्यामुळे (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास तात्पूरती स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेशच उर्जामंत्री (Nitin Raut) नितीन राऊत यांनी दिल्याने आता स्थानिक पातळीवर निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल 1 हजार 608 रोहित्रांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. निर्णय घेण्यास सरकारला उशिर झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

तीन महिन्याची मुदत, पुन्हा काय?

सध्या शेतकऱ्यांची अवस्था आणि रब्बी हंगामातील पिकांची स्थिती पाहून कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत कऱण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी कृषीपंपाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांची सुटका ही होणारच नाही. सध्या तीन महिन्याकरिता ही मोहीम खंडीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी वीजबिल अदा केले नाही तर पुन्हा कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही वाढीव मुदतीचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे महावितरणच्या वतीने मांडण्यात आले आहे.

आदेश मिळताच कारवाईला सुरवात

शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवन्याचा निर्णय सभागृहात झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात वीज तोडणी बंद झाली असून तोडलेले वीज कनेक्शन जोडणी सुरू झाली . एका दिवसात महावितरणने जिल्ह्यात 1 हजार 608 डीपी सुरू केल्या. नांदेड जिल्ह्यात एकूण कृषी पंपधारक शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 33 हजार 188 इतकी आहे . त्यांच्याकडे 1 हजार 732 कोटी 88 लाख रुपये थकबाकी आहे . थकबाकी वसुलीसाठी महावितरणने जिल्ह्यात 1 हजार 728 डीपी बंद केल्या होत्या . त्यापैकी एका दिवसात 1 हजार 608 डीपी सुरू करण्यात आल्या .

रब्बी पिकांची काय अवस्था?

यंदा पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरत आहेत. शिवाय शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठाही आहे. असे असतानाही ऐन दाणे भरण्याच्या प्रसंगीच महावितरणने विद्युत पुरवठा हा खंडीत केला होता. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी हतबल झाला होता. तर राज्यभर सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात होता. मध्यंतरीच्या कारवाईमुळे पिकांना दोन पाळ्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे याचा थोड्याबहूत प्रमाणात उत्पादनावर परिणाम होईल अशी शंका उपस्थित केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Gadchiroli : ठसका उठण्यापूर्वीच मिरची पिकाला रोगराईने घेरले, कृषितज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला?

Soybean Crop : सोयाबीन दरात चढ-उतार, शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत, काय आहे बाजारपेठेतले वास्तव?

Onion Rate : कांद्याची विक्रमी आवक, चाकण बाजार समितीमध्ये दिवसागणिक दरात होतेय घट..!

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.