Rabi Season : हरभरा उत्पादनात मराठवाडा अन् विदर्भातील 5 जिल्हे ‘टॉप’वर, जोडपिकालाच प्राधान्य

यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व देत आहेत. सध्या हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. शिवाय 'नाफेड'ने उभारलेल्या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के खरेदी ही राज्यातील 5 जिल्ह्यांची आहे.

Rabi Season : हरभरा उत्पादनात मराठवाडा अन् विदर्भातील 5 जिल्हे 'टॉप'वर, जोडपिकालाच प्राधान्य
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:31 AM

लातूर : यंदा (Rabi Season) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही (Seasonable Crop) हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व देत आहेत. सध्या (Chickpea Crop) हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. शिवाय ‘नाफेड’ने उभारलेल्या हमीभाव केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हरभरा खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के खरेदी ही राज्यातील 5 जिल्ह्यांची आहे. यामध्ये मराठवाड्यातील 3 तर विदर्भातील 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पादकता तर वाढली शिवाय क्षेत्रही वाढल्याचा परिणाम हरभरा उत्पादनावर झाला आहे.

या 5 जिल्ह्यांचा समावेश

कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत रबी हंगामात हरभरा पिकावर भर दिला होता. त्यामुळे क्षेत्र तर वाढले पण पोषक वातावरणामुळे उत्पादकताही वाढली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील एकूण खरेदीच्या 70 टक्के ही हरभरा हा लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यातील आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूगानंतर लागलीच हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. खरिपातील उत्पादनानंतर लागलीच रब्बीत येणाऱ्या हरभरा पिकाच्या उत्पादनातून शेतकरी चांगला परतावा मिळवत आहे. त्यामुळे जोडपिकाला महत्व दिले जात आहे.

खरेदी केंद्रावरील दराचा लाभ

गेल्या महिन्याभरापासून हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. पण बाजारभावापेक्षा नाफेड ने उभारलेल्या हमीभाव केंद्रावरीलच दर अधिकचा राहिलेला आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 असा दर आहे तर नाफेडने ठरवून दिलेला दर हा 5 हजार 230 एवढा आहे. हरभऱ्याचे दर वाढतील असा अंदाज आहे पण गेल्या महिन्याभरात खुल्या बाजारपेठेत दर हे स्थिरच आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्र जवळ करीत आहेत. शिवाय हमीभाव केंद्रवरील व्यवहारही आता चोख होत आहेत.

बाजारपेठेतील दर स्थिर, नोंदणीमध्ये वाढ

हंगाम सुरु झाल्यापासून बाजारपेठेतील दरात फरक झालेला नाही. शेतकऱ्यांना दर वाढतील अशी आशा होती पण आवक वाढल्याने दर स्थिर राहिले आहेत. बाजारपेठ आणि खरेदी केंद्रातील दरात 600 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावरच हरभरा विक्रीला प्राधान्य देत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करुन शेतकरी हरभरा विक्रीची नोंदणी आणि त्यानंतर विक्री करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

PM Kisan Yojna : सर्वात मोठ्या कृषी योजनेत अनियमितता, लाखो अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ, आता वसुलीचे उद्दीष्ट

State Government : मेंढपाळांची भटकंती थांबणार, पशुधनविमा योजनेबाबत सरकारची भूमिका काय?

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.