गुलाबाची लागवड करून शेतकऱ्याने बदलले नशीब, वर्षभरात एवढ्या लाखांची कमाई
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या चांगल्या पद्धतीची शेती करीत असल्याचे पाहायला मिळतं आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने ९ एकर शेतीमध्ये गुलाबाची लागवड केली आहे. त्यांना यावर्षी लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.
लातूर : महाराष्ट्रातील शेतकरी (MAHARASHTRA FARMER) पारंपारीक शेती करतात, परंतु त्यांना त्याचा फायदा अधिक होत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. शेतीचं कायम नुकसान होत असल्यामुळे शेतकरी (AGRICULTURAL NEWS IN MARATHI) परेशान झाले आहेत. त्यामुळे शासन सुध्दा शेतकऱ्यांना मदत करताना दिसत आहे. म्हणजे आधुनिक पद्धतीची शेती करण्याचा सल्ला देत आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी गुलाब शामराव सुरवसे यांनी गुलाबाची लागवड (ROSE CULTIVATION) करुन लाखो रुपये कमावले आहेत.
वर्षाची कमाई लाखो रुपये
कमी जमीन, कमी मेहनत, कमी वेळ असं सगळं लागतं असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनंतपाल तालुक्यातील शेतकरी बाबूराव शामराव सुरवसे यांनी ९ एकरात गुलाबाची शेती केली आहे. गुलाबाच्या शेतीमधून त्यांना वर्षाला साडेतीन लाख रुपयाचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भागातील अनेक शेतकरी गुलाबाची शेती शिकण्यासाठी बाबूराव शामराव सुरवसे यांच्याकडे येत आहेत.
सगळ्या शेतीसाठी फक्त ३५ हजार खर्च
बाबूराव शामराव सुरवसे यांनी त्यांच्या मालकीच्या ९ एकर शेतात गुलाब लावला आहे. शेतीला एकूण सगळा खर्च ३५ हजार रुपये आला आहे. सध्या गुलाबाच्या झाडांना फुलं लागायला सुरु झालं आहे. त्यांना दिवसाचा सगळा खर्च काढला, तर १ हजार रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात.
प्रत्येक महिन्याचा फायदा ठरलेला असतो
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आता व्यवसाय म्हणून गुलाबाची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यातं आलं आहे. तिथले शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. त्याचबरोबर तिथल्या तहसिलदारांनी सुध्दा त्यांचं कौतुक केलं आहे. प्रत्येक महिन्याचा शेतकऱ्यांचा फायदा ठरलेला असतो.