भाजीपाला सोडून सुरू केली शिंगाडा शेती, आता दरवर्षी कमावतो १५ लाख रुपये
साहेब आधी धान आणि कांद्याची शेती करत होते. त्यात त्यांना हवा तसा फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शिंगाडा शेती सुरू केली.
नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२३ : वेळेसोबत शेती करण्याची पद्धती बदलत आहे. शेती करण्याचे वेगवेगळे पर्याय शेतकऱ्याकडे उपलब्ध आहेत. एका उत्पन्नात नुकसान होत असेल तर दुसरे उत्पादन घेता येते. यामुळे उत्पादन वाढू शकते. आता आपण अशाच एका शेतकऱ्याविषयी पाहणार आहेत. या शेतकऱ्याला कांद्यात नुकसान झाले. धानातून फारसा नफा होत नव्हता. मग, त्याने शिंगाडा शेती सुरू केली. आता शिंगाडा शेतीतून तो लाखो रुपये उत्पन्न घेत आहे. याची चर्चा सर्वत्र होत आहे.
दरवर्षी कमावतात १५ लाख
ही स्टोरी आहे पटणा जिल्ह्यातील उदयनी गावातील साहेब यांची. साहेब आधी धान आणि कांद्याची शेती करत होते. त्यात त्यांना हवा तसा फायदा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शिंगाडा शेती सुरू केली. एका वर्षात ते लखपती झाले. १० बिघा जमीन किरायाने घेऊन ते शिंगाडा शेती करतात. यातून त्यांना दरवर्षी सुमारे १५ लाख रुपये उत्पन्न मिळते.
एकच पिकं घेतल्याने नुकसान
शेतकरी साहेब म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून ते शिंगाडा शेती करत आहेत. रब्बीमध्ये ते गहू आणि चनाही काढतात. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे. ५५ वर्षीय साहेब म्हणतात, आधुनिक पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळेल. पण, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. एकच पिकं घेतल्याने जमिनीतील पोषकतत्व कमी होतात. त्यामुळे दुसरे पिकं घेतले पाहिजे.
शिंगाडा शेतीतील बारकावे शिकावे लागते. शिंगाडा इतर उत्पादनांपेक्षा उशिरा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर धरावा लागतो. शेतकरी हा फारसा शिकलेला नसतो. नवीन प्रयोग करणे त्याला कठीण जाते. आपण त्यात सक्सेस झालो नाही, तर अशी शंका त्याला येते. त्यामुळे तो सहसा टीकाव धरत नाही. परंतु, हिंमत केल्यास नक्कीच यश मिळते. त्यासाठी गरज असते ती मेहनत करण्याची. शिंगाडा उत्पादक साहेब यांनी तेचं केलं. वेगळा प्रयोग केला. त्यात ते यशस्वी झाले. आता आजूबाजूचे शेतकरी त्यांना विचारणा करतात. उत्पन्नात वाढ कशी करता येईल. यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.