‘जात’ सांगायची आणि रासायनिक खत घ्यायचं, या जिल्ह्यातील शेतकरी वर्ग नाराज

याबाबत खत विक्रेत्याला विचारणा केली असता. मशिनला नवीन अपडेट आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणामुळं शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

'जात' सांगायची आणि रासायनिक खत घ्यायचं, या जिल्ह्यातील शेतकरी वर्ग नाराज
government machineImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:33 AM

शंकर देवकुळे, सांगली : रासायनिक खत (Chemical fertilizers) खरेदी करताना आता शेतकर्‍यांना (Farmer) पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पध्दतीचे अपडेटस आले आहेत. खत खरेदी करताना दुकानदारांकडून (Chemical fertilizers shopkiper) आपल्या जाती बद्दलची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना आपली जात सांगावी लागत असल्यामुळे बळीराजांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी नेमका जाब कुणाला विचारायचा अशा संकटात शेतकरी पडला आहे. त्याचबरोबर खत खरेदी करताना इतकी माहिती कशासाठी हवी असंही शेतकरी म्हणत आहेत.

शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाल्याची जिल्ह्यात चर्चा

शेतकर्‍यांना दुकानात खत खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचं नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्‍यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे. याबाबत खत विक्रेत्याला विचारणा केली असता. मशिनला नवीन अपडेट आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणामुळं शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता शक्यता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यावेळी मोठा गोंधळ देखील होईल असंही काही शेतकरी म्हणतात.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांची जोरदार टीका

संजय राऊत यांनी या महाराष्ट्रातील आणि केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे. सरकारने जात आणि धर्माच्या नावावर राज्यात मोठं राजकारण केलं आहे. महाराष्ट्रात यापुर्वी हे कधीचं पाहायला मिळतं नव्हतं. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे. प्रत्येक ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार जात दाखवण्याचं काम करीत आहे. शेवटी महाराष्ट्रातील बारा कोटीच्या लोकांना त्यांचा धर्म दाखवावा लागेल असं राऊत म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.