PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहोचणार 2000 रुपयांचा आठवा हप्ता? सरकारने दिले उत्तर

| Updated on: Apr 05, 2021 | 9:32 PM

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी टीव्ही-9 डिजिटलशी बोलताना सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस 20 ते 25 दरम्यान 2 हजार रुपयांचा हप्ता सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर पोहचेल. (The government replied, when will the eighth installment of Rs. 2000 reach the farmers' account)

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहोचणार 2000 रुपयांचा आठवा हप्ता? सरकारने दिले उत्तर
PM Kisan Samman Nidhi
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi scheme)च्या आठव्या हप्त्यासाठी पैसे पाठविण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. ही रक्कम मोठी असल्याने पंतप्रधान दर चार महिन्यांनी स्वत: जाहीर करतात. यावेळी ते निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे किसान निधीचे पैसे देण्याबाबत कोणताही निर्णय ठरलेला नाही. परंतु केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी टीव्ही-9 डिजिटलशी बोलताना सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस 20 ते 25 दरम्यान 2 हजार रुपयांचा हप्ता सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर पोहचेल. (The government replied, when will the eighth installment of Rs. 2000 reach the farmers’ account)

कैलास चौधरी म्हणाले की, ही एक अखंड योजना आहे. शेतकर्‍यांना बर्‍याच कालावधीपासून पैसे देण्यात आले आहेत, त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नाही. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की काही मीडिया संस्था असे लिहित आहेत की, आठवा हप्ता देण्यास 1 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र ही बातमी चुकीची आहे. पैसे अद्याप जाहीर झाले नाहीत. आठव्या हप्त्याबाबत माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊ नये.

20 हजार कोटी एकाच वेळी रिलीज केले जाऊ शकतात

यावेळी एकाच वेळी सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना 20 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मंत्रालयाच्या वतीने सर्व कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. केवळ पंतप्रधानांचा कार्यक्रम होणे बाकी आहे. पीएम किसान योजनेसाठी वार्षिक 65 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. हे पैसे तीन वेळा जाहीर केले जातात. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत 9,92,12,971 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठविण्यात आले आहेत. अखेर 25 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9 कोटी शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले. इतर लोकांची जसजशी पडताळणी पूर्ण होत होती तसतसे पैसे पाठविण्यात आले.

असे तपासा पैसे आले की नाही

– पंतप्रधान किसान योजनेच्या संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) वर क्लिक करा.
– उजव्या बाजूला तुम्हाला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल.
– ‘Beneficiary status’ वर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल.
– यामध्ये आधार क्रमांक, बँक खाते किंवा मोबाईल नंबरमधील पर्यायांपैकी एक निवडा.
– यापैकी कोणत्याही एका माध्यमातून आपण आपला स्टेटस तपासू शकता.
– हप्त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

पंतप्रधान किसान योजनेच्या अटी

– केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी यापासून दूर राहतील.
– व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता, सीए, वकिल आणि आर्किटेक्ट या योजनेतून बाहेर असतील.
– नगराध्यक्ष किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार.
– असे शेतकरी जे भूतपूर्व किंवा विद्यमान संविधानिक पदाधिकारी आहेत, ते विद्यमान किंवा माजी मंत्री आहेत.
– गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या शेतक्यांना लाभ मिळणार नाही.
– ज्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांनाही लाभ मिळणार नाही.
– 6000 रुपयांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. (The government replied, when will the eighth installment of Rs. 2000 reach the farmers’ account)

इतर बातम्या

Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमनची कोरोना चाचणी अखेर निगेटिव्ह, पत्नी अंकिताचे मानले आभार

Corona Cases And Lockdown News LIVE : सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 360 नवे कोरोना रुग्ण