Chickpea Crop : हमी भावाचा आधार संपला, आता दर्जेदार हरभऱ्यालाच मागणी
राज्यातील खरेदी केंद्र बंद होऊन महिना उलटला आहे. हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला आहे. यातच आता हरभरा डाळीच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने दरही सुधारत आहेत. पण प्रक्रिया उद्योजकांकडून जाड हरभरा वाणाचीच मागणी होत आहे. याच वाणाचा हरभरा कमी असल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होऊ लागल्याने विशिष्ट हरभऱ्यालाच चांगला दर मिळत आहे.
लातूर : यंदा (Rabbi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले पण शेतकऱ्यांना त्यामधून अपेक्षित उत्पन्न काही पदरी पडले नाही. राज्यात (Guarantee Rate) हमीभाव केंद्र सुरु झाली ते देखील मर्यादीत काळासाठी. (Nafed) नाफेडने उद्दिष्टपूर्ती झाली की 8 दिवस आगोदरच हमीभाव केंद्र ही बंद केली. आता शेतकऱ्यांकडे केवळ खुल्या बाजारपेठेचा पर्याय आहे. शिवाय येथे दर्जेदार हरभऱ्यालाच अधिकचा दर आहे. यामध्ये स्थानिक वाणाच्या हरभऱ्याचे दर स्थिर आहेत तर जाड हरभरा वाणाला अधिकचा दर आहे. त्यामुळे भरघोस उत्पादन होऊनदेखील दरामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. हरभरा डाळ आणि बेसणाच्या मागणीत वाढ झाल्याने किमान दरात किंचित वाढ होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.
साठा मर्यादित, मागणीत वाढ
राज्यातील खरेदी केंद्र बंद होऊन महिना उलटला आहे. हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला आहे. यातच आता हरभरा डाळीच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने दरही सुधारत आहेत. पण प्रक्रिया उद्योजकांकडून जाड हरभरा वाणाचीच मागणी होत आहे. याच वाणाचा हरभरा कमी असल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होऊ लागल्याने विशिष्ट हरभऱ्यालाच चांगला दर मिळत आहे. अधिक क्षेत्रावर साध्या वाणाच्या हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सर्रास शेतकऱ्यांना 4 हजार 500 याप्रमाणेच हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.
नाफेड कडूनही विक्रीला सुरवात, दरावर काय परिणाम
हंगामाच्या सुरवातीला नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, गतमहिन्यात राज्यभरातील खरेदी केंद्र हे उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. आता नाफेडनेच हरभरा बाजारात आणला आहे. नाफेडकडून चांगल्या प्रतीचा असा 26 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आला होता. आता या हरभऱ्याच्या विक्रीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विक्री ही मर्यादित स्वरुपात होणार असल्याने त्याचा बाजारपेठेतील दरावर काही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
असे आहेत बाजार समितीमधील दर
आता साठवणूकीतील हरभरा शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय संपूर्ण हंगामात हरभऱ्याला दर कमीच राहिलेला आहे. असे असताना आता आवक आणि दर दोन्हीही घटलेले आहेत. सध्या कल्याण बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 5 हजार ते 7 हजार रुपये क्विंटल असा दर आहे. शहादा 3 हजार ते 7 हजार 300, जळगाव 8 हजार ते 8 हजार 100 रुपये, अकोला 4 हजार 250 ते 4 हजार 450 रुपये तर अमरावती बाजार समितीमध्ये 4 हजार 200 ते 4 हजार 400 रुपये असा दर आहे.