नागपूर : प्रत्येक पिकाचे सरासरी क्षेत्र हे ठरलेले असते. त्यानुसारच उत्पादकता आणि लागवडीचे क्षेत्र हे ठरवले जाते. पण हळद पिका याबाबतीत अपवादात्मक होते. कारण आतापर्यंत ढोबळमानानेच (Turmeric Production) हळदीचे सरासरी क्षेत्र ठरवले जात होते. मात्र, (agriculture commissioner) आयुक्तांच्या सुचनेनंतर आता कुठे बांधावर जाऊन लागवडीची नोंद घेण्यात आली तेव्हा वेगळेच गुपीत बाहेर पडले आहे. देशात हळद लागवडीत महाराष्ट्र हा अव्वल स्थानी असल्याचे समोर आले आहे. राज्यात 82 हजार हेक्टरावर हळदीची लागवड करण्यात आली आहे तर यापूर्वी तेलंगणा राज्यात सर्वाधिक लागवड असल्याची नोंद होती.
लांबणीवर पडलेला पाऊस, हळद क्षेत्रामध्ये साचलेले पाणी शिवाय अंतिम टप्प्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हळदीच्या उत्पादकतेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे आता हळदीचे दर हे 10 हजार रुपये क्विंटलकडे वाटचाल करीत आहेत. यंदा 15 ते 20 उत्पादकतेमध्ये घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली-सातारा या भागातील हळद ही फेब्रुवारीपर्यंत काढली जाते तर मराठवाड्यातील सांगली, परभणी, हिंगोली येथेही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हळदीच्या वैशिष्टानुसार हळदीचे दर हे ठरले जातात. सौदार्य प्रसाधनासाठी हिंगोली येथील हळदीला अधिकची मागणी आहे. यातच यंदा उत्पादकता घटल्याने दरात तेजी राहणार आहे.
राज्यात सर्वाधिक क्षेत्र हे मराठवाड्यात आहे. यापूर्वी हळदीची लागवड ही वरंब्यावर केली जात होती. त्यामुळे उत्पादनात घट होत होती. काळाच्या ओघात गादी वाफा, फर्टिगेशन, ठिबक सिंचन अशा व्यवस्थापनेचा वापर वाढत गेला. त्यामुळे लागवड क्षेत्रामध्ये आणि उत्पादकतेमध्येही वाढ झाली आहे. बिहार नंतर महाराष्ट्रातच सर्वाधिक उत्पादकता असल्याचे वृत्त अॅग्रोवन ने प्रकाशित केले आहे. येथील वातावरण, शेतजमिन यामुळे उत्पादकता वाढत आहे. तर अधिकच्या दरामुळे शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. मराठवाड्यातील हिंगोली येथे मोठी बाजारपेठ असून येथील हळद परराज्यात निर्यात केली जाते. दिवसेंदिवस हळदीचे दर आणि क्षेत्रही वाढत आहे.
हळदीची बाजारपेठ आणि लागवड क्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये हिंगोली जिल्हा आघाडीवर आहे. येथील बाजारपेठेतून गुजरात, कर्नाटक या ठिकाणी हळदीची निर्यात केली जाते. तर राज्यातील 84 हजार लागवडी क्षेत्रापैकी एकट्या हिंगोली जिल्ह्यात 49 हजार हेक्टरावर हळदीची लागवड केली जात आहे. योग्य व्यवस्थापन येथील शेतजमिन यामुळे उत्पादकताही मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत मराठवाड्यात हळद पिकाचे स्वरुप बदलताना दिसत आहे.