Positive News: थंडी कमी होताच केळीच्या दरात वाढ, काय आहे खानदेशातले चित्र?
उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्षात बागांची अवस्था यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय मध्यंतरीच्या गारठ्यामुळे केळीच्या मागणीतही घट झाली होती. मात्र, आता परस्थिती बदलतेय. थंडी कमी पडत असल्याने पुन्हा केळीच्या मागणीत सुधारणा होत आहे. एवढेच नाही आवकही वाढत असल्याने बदलत्या परस्थितीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जळगाव : केळी लागवडीनंतर सर्वकाही प्रतिकूल परस्थिती असताना आता ऐन महत्वाच्या वेळी तरी सकारात्मक बाब समोर येत आहे. खानदेशासह मराठवाड्यातील (Banana Orchard) केळी बागांवर बदलत्या वातावरणाचा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. मध्यंतरी जालना य़ेथील शेतकऱ्यांनी बागाच जमिनदोस्त केल्या होत्या. उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्षात बागांची अवस्था यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय मध्यंतरीच्या (Winter) गारठ्यामुळे केळीच्या मागणीतही घट झाली होती. मात्र, आता परस्थिती बदलतेय. थंडी कमी पडत असल्याने पुन्हा (Banana Arrival) केळीच्या मागणीत सुधारणा होत आहे. एवढेच नाही आवकही वाढत असल्याने बदलत्या परस्थितीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केळी उत्पादनाबद्दल प्रथमच सकारात्मक वातावरण तयार झाले असून असेच कायम रहावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आवकही वाढली आणि दरातही सुधारणा
मध्यंतरी थंडीत वाढ झाल्याने मागणी घटली परिणामी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत विक्री करण्याचे टाळले होते. अखेर आता वातावरणात बदल होताच केळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवकही वाढली आहे. मध्यंतरी आवक वाढूनही दर हे कमीच होते. पण आता चित्र बदलतेय किमान 430 रुपये ते 850 पर्यंत प्रतिक्विटलचा दर आहे. जळगावमध्ये दररोज 16 टन केळीची आवक सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून आवक वाढली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
परदेशातील निर्यातही लवरच सुरू होणार
सध्या खानदेशातील केळीला दिल्ली, पंजाब, काश्मीर या उत्तरेकडील राज्यातून मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात का होईना सुधारणा होत आहे. चांगल्या प्रतीच्या केळींना प्रती क्विंटल 850 रुपयांपर्यंतचा दर आहे. शिवाय असेच दर राहिले तर लवकरच परदेशातही निर्यात केली जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्यातीवर अंकूश आले होते. मात्र, आता सर्वकाही सुरळीत होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
काय होती परस्थिती?
शेतीमालाच्या गुणवत्तेवरच त्याचा दर अवलंबून आहे. यंदा तर सातत्याने वातावरणातील बदलाचा परिणाम थेट उत्पादनावर तर झालेला आहेच शिवाय मालावर झालेला आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना दर्जानुसारच दर मिळाला आहे. आता चांगल्या केळीला 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर खराब झालेल्या मालाला 250 रुपये पर्यंतचा दर मिळत होता. वर्षभर उत्पादन घेण्यासाठी होत असलेला खर्च आणि आता प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडून होत असलेली खरेदी यामध्ये मोठी तफावत असल्याने झालेला खर्च कसा काढावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
संबंधित बातम्या :
Cotton Rate: पांढर सोनं अजूनही घरातच, दरावरुन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम, काय आहे सल्ला?