Sindhudurg : भाजीपाल्याचे दर गगनाला मात्र फायदा कुणाला, मार्केटमधले वास्तव काय?
सिंधुदुर्गात आठवड्याला जवळपास पंचवीस लाख उलाढालीचा भाजीपाल्याचा होणारा व्यवसाय परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हातात गेला आहे. स्थानिक बेरोजगारांची या व्यवसायाबाबतची अनास्था, कष्ट करण्याच्या मर्यादा आणि नियोजनाच्या अभावामुळे रोजगाराची संधी असलेले हे मोठे क्षेत्र स्थानिकांपासून दूर आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच स्थानिक व्यापारी या व्यवसायात आहेत.
सिंधुदुर्ग : यंदा पावसामुळे केवळ (Kharif Season) खरीप हंगामातील पिकाचेच नुकसान झाले असे नाहीतर फळबाग आणि आता (Vegetable Damage) भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे घटलेले उत्पादन आणि वाढलेली मागणी यामुळे सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली आहे. हे चित्र केवळ मार्केटमधील आहे. कारण शेतकऱ्यांच्या मालाला आहे तोच दर मिळतोय. (Farmer) शेतकरी आणि विक्रत्ये यांच्यामध्ये असलेले दलाल हे अधिकची लूट करीत आहेत. मार्केटमध्ये मागणी नाही असे शेतकऱ्यांना सांगून कमी दरात खरेदी आणि तोच माल पावसाने नुकसान झाल्याचे सांगत अधिकच्या दरात विक्री केली जात आहे. त्यामुळे त्यामुळे वाढत्या दराचा फायदा ना शेतकऱ्यांना होत आहे ना विक्रेत्यांना. शेतकरी आणि विक्रत्येच्या मध्यभागी असलेले दलाल मात्र दोन्ही बाजूकडून लूट करीत आहेत.
परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप
सिंधुदुर्गात आठवड्याला जवळपास पंचवीस लाख उलाढालीचा भाजीपाल्याचा होणारा व्यवसाय परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हातात गेला आहे. स्थानिक बेरोजगारांची या व्यवसायाबाबतची अनास्था, कष्ट करण्याच्या मर्यादा आणि नियोजनाच्या अभावामुळे रोजगाराची संधी असलेले हे मोठे क्षेत्र स्थानिकांपासून दूर आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच स्थानिक व्यापारी या व्यवसायात आहेत.
गावोगावात आठवडी बाजार
दलाली मुळे पुरेसे उत्पन्न ह्या व्यापाऱ्यांना मिळत नसल्याची खंत स्थानिक भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक गावाच्या आठवडी बाजाराला हे परप्रांतीय विक्रेते येऊन भाजी विकत घेतात. त्यांच्याकडे भाजी स्वस्त मिळत असल्यामुळे बाजारात येणारे ग्राहक ही त्यांच्या कडूनच भाजी खरेदी करतात. गावागावात हेच चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्याचे भाजीचे अर्थकारण हे परप्रांतीयांच्या हातात गेले आहे. यामध्ये स्थानिक तरुणांना संधी आहे मात्र, तशाप्रकारे नियोजन आणि धाडस करणे गरजेचे असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
भाजीपाल्याच्या दरात वाढ
सततचा पाऊस आणि इंधनाच्या वाढत्या दराचा परिणाम भाजीपाल्यावर झालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर हे वाढतातच पण यंदा वाढीची तीव्रता ही अधिकच आहे. कारण गेल्या दीड महिन्यापासून राज्यात पावसाचे सातत्य आहे. त्यामुळे भाजीपाल्यावर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून खरेदी करणारे व्यापारी हे ओढावलेल्या परस्थितीचा बाऊ करुन अधिकची लूट करीत आहेत.