शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्राने शोधून काढला ‘त्या’ रोगावर जालीम उपाय
शेतकऱ्यांसाठी विशेषतः पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक बाब आहे. केंद्राच्या परवानगीने लवकरच त्या निर्णयाची अंमलबजवानी होण्याची शक्यता आहे.
प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. अनेक राज्यांमध्ये लम्पी आजारामुळे ( LumpingDiseases ) रुग्ण दगावली होती. अनेक जनावरं मृत्युच्या दारात जाऊन पोहचली होती. त्या दरम्यान उपचार करण्यासाठी सरकारकडून मदतही करण्यात आली आहे. काही लस ही देण्यात आल्या. मात्र, यावर कायमस्वरूपी उपाय व्हावा यासाठी लस तयार करण्यात आली नव्हती, त्यामुळे जनावरांना असणारा लम्पी आजार कायम होता. भलेही त्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांच्या ( Farmer News ) मनात भीती कायम होती. मात्र, ही भीती आता दूर होणार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार करण्यात आली असून केंद्राने त्याला मान्यता दिली आहे.
लम्पी आजारावर लस शोधली गेल्याने पशुधन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लम्पी रोग आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात होते. लम्पी रोगावर प्राथमिक उपचार आणि यापूर्वी दिल्या जाणाऱ्या लसीमधून जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते.
मात्र, हे प्रमाण खूपच कमी होणार असून लम्पी आजारही जनावरांना कमी प्रमाणात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं ही लस शोधली आहे.
अद्याप या लसीला विक्रीसाठी मान्यता केंद्र सरकारने दिली नसली तरी ही लस प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं लस करत असतांना लम्पी आजार समोर ठेऊनच निर्मिती केली आहे.
ग्रामीण भागात आजही लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने काही प्रमाणात दिलासा होता. परंतु आता मोठा दिलासा यानिमित्ताने पशुधनाचा सांभाळ करत असेलल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरंतर महाराष्ट्रसह देशातील 15 राज्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात पशुधन अडचणीत आले होते. उपचाराअभावी अनेक जनावरे दगावली होती. मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण कमी होते.
त्यातच आता संपूर्ण देशात लम्पी रोगावर लस कधी होणार याची उत्सुकता होती. मात्र त्याबाबत दिलासादायक बाब समोर आली आहे. पुण्यात ही लस निर्माण करण्यात आली असून भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं ही लस निर्माण केली आहे.
लाखों जनावरे दगावल्यामुळे लम्पी रोगावर लवकरात लवकर लस यावी अशी मागणी केली जात होती. इतर राज्यही ताब्यात प्रयत्न करत होते. मात्र यामध्ये महाराष्ट्राने त्याबाबत बाजी मारली असून मोठा दिलासा यानिमित्ताने मिळणार आहे.