Cotton Production : बाजार समितीचा असा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार अन् बाजारपेठही फुलणार, वाचा सविस्तर

कधीकाळी जिल्ह्यातील आटपाडी हे कापसाच्या बाजारासाठी प्रसिध्द होते. शिवाय येथील वातावरण पोषक असल्याने उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळायचे. मात्र, काळाच्या ओघात या तालुक्यातून कापसाचे पीकच हद्दपार झाले आहे. त्यामुळे आता कापसाला योग्य बाजारपेठे मिळवून देण्याचा निर्धार येथील बाजार समितीने केला आहे.

Cotton Production : बाजार समितीचा असा 'हा' निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार अन् बाजारपेठही फुलणार, वाचा सविस्तर
युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर हे स्थिरावले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:37 PM

सांगली : कधीकाळी जिल्ह्यातील आटपाडी हे (Cotton Market) कापसाच्या बाजारासाठी प्रसिध्द होते. शिवाय येथील (The environment is nutritious) वातावरण पोषक असल्याने उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळायचे. मात्र, काळाच्या ओघात या तालुक्यातून कापसाचे पीकच हद्दपार झाले आहे. त्यामुळे आता कापसाला योग्य बाजारपेठे मिळवून देण्याचा निर्धार येथील (Market Committee) बाजार समितीने केला आहे. तालुक्यात पुन्हा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कापूस लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंतचे व्यवस्थापन हे बाजार समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. यंदा कापसाच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. असे असताना मुख्य बाजारपेठेत उलाढालच झाली नाही. कापसाचे वाढते महत्व लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता तज्ञांची कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी असा प्रयोग करणारी आटपाडी ही पहिलीच बाजार समिती असल्याचे सांगितले जात आहे.

कशामुळे घटले होते उत्पादन?

आटपाडी येथे 15 वर्षांपूर्वी कापसाची मोठी बाजारपेठ होती. शिवाय कापसाचे क्षेत्रही सर्वाधिक होते. मात्र, सलग तीन वर्ष बोगस बियाणांचा पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय त्यानंतर निसर्गाचा लहरीपणा यामुळे तालुक्यातील शेतकरी हताश झाला होता. यामुळे दिवसेंदिवस उत्पादन क्षेत्रात मोठी घट झाली आहे. आता तर केवळ नावालाच लागवड केली जात आहे. मात्र, सर्वकाही पोषक असतानाही कापसाचे उत्पादनच नाही त्यामुळे येथील बाजारपेठेला गतवैभव मिळवून देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.

बाजार समितीचे असे हे प्रयत्न..

कापसाची बाजार निर्माण व्हावी ही केवळ घोषणा नाही तर त्यासाठी प्रयत्नही सुरु झाले आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कापूस पैदासकार शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. प्रा. नवनाथ मेढे, डॉ. नंदकुमार भुते आणि डॉ. आनंद इंगळे यांची कापूस लागवड आणि व्यवस्थापन या अनुशंगाने कार्यशाळा घेण्यात आली आहे. याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होईल असा विश्वास बाजार समितीने व्यक्त केला आहे. शिवाय शेतकऱ्यांना नॉन बीटी बियाणे मिळवून देणार असल्याचे आश्वासन कृषी तज्ञांनी दिले आहे.

असे वाढणार कापसाचे क्षेत्र

आटपाडी तालुक्यात कापसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी काही निवडक शेतकऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. सुरवातीला या निवडलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर कापूस लागवड केली जाणार आहे. याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला तर तालुक्यात सर्वत्र कापूस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

गोष्ट पडद्यामागची : शेतकऱ्यांचा रोष पीकविमा कंपन्यावर, मात्र विमा परतावा रखडण्याचे नेमके कारण काय?

Onion Crop : पारा घसरला अन् शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, मुख्य आगारात कांद्याची काय स्थिती?

Rabi Season: कडधान्यच जोमात, मुख्य पिकांची काय अवस्था? शेतकऱ्यांचा निर्णय योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.