कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव नाही, अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागांचं नुकसान, घेतलेलं कर्ज कसं फेडावं
कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पाहायला मिळत आहे. एकीकडे कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नाही
उमेश पारीक, नाशिक : द्राक्षांची (Grapes) पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड (Nifad) तालुक्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या 20 ते 25 मिनिटे वादळी वाऱ्यासह गारपिट आणि अवकाळी पावसाचा (Unseosonal Rain) परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या गुरुवारी 45 रुपयाने कुंभारी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर घंगाळे यांनी द्राक्ष निर्यातदार व्यापाऱ्यासोबत व्यवहार केला होता. सोमवारपासून द्राक्ष काढणीला सुरुवात होण्याअगोदर शनिवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. पुढील वर्षी द्राक्ष पीक घेण्यासाठी आज द्राक्ष काढून फेकण्यासाठी लागणारी एका मजुराला 400 रुपये मजुरी देण्यासाठी नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबा उदारनिर्वाह कसा करावा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नाही
कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पाहायला मिळत आहे. एकीकडे कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नाही, तर दुसरीकडे निफाड तालुक्यातील पंचकेश्वर, कुंभारी, रानवड आणि नांदुर्डी या गावांत शनिवारी झालेल्या गारपिटीचे परिणाम आता कांदा पिकावर दिसण्यास सुरुवात झाले असून कांद्यावर असलेल्या पाती मोडून पडत असल्याने कांदा उत्पादकांनी कांद्यावर हजारो रुपये खर्च केलेला वाया जाणार आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने कांदा उत्पादकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांना केंद्र व राज्य सरकारकडे मदतीची मागणी करीत आहेत.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान शेतीची पाहणी करत मदतीसाठी खासदार विनायक राऊत लोकसभेत मुद्दा मांडणार, तसेच महाराष्ट्र शासनाला पत्र लिहून शेतकऱ्यांच्या उत्पादनानुसार आजच्या बाजार भाव मूल्यानुसार मदत करावी अशी मागणी करणार असल्याचे निफाड तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीची पाणी दरम्यान खासदार विनायक राऊत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.