लेट पण थेट : द्राक्ष निर्यात जोमात, रशिया-युक्रेन युध्दाचा निर्यातीवर काय परिणाम? वाचा सविस्तर
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा द्राक्ष हंगाम लांबणीवर पडलेला आहे. राज्यात नाशिक पाठोपाठ सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात होते. हंगामाच्या सुरवातीला द्राक्षांमध्ये गोडवा उतरलेला नव्हता त्यामुळे नोंदणी होऊनदेखील निर्यातीचा वेग हा मंदावलेला होता. फेब्रुवारीच्या सुरवातीपासून उन्हात वाढ झाल्याने द्राक्ष ही निर्यातीयोग्य झाली आहेत. हे सर्व असले तरी गतवर्षीपेक्षा कमीच द्राक्षाची निर्यात होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे म्हणणे आहे.
सांगली : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा (Grape Season) द्राक्ष हंगाम लांबणीवर पडलेला आहे. (Maharashtra) राज्यात नाशिक पाठोपाठ सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात होते. हंगामाच्या सुरवातीला द्राक्षांमध्ये गोडवा उतरलेला नव्हता त्यामुळे नोंदणी होऊनदेखील निर्यातीचा वेग हा मंदावलेला होता. फेब्रुवारीच्या सुरवातीपासून उन्हात वाढ झाल्याने (Grape Export) द्राक्ष ही निर्यातीयोग्य झाली आहेत. हे सर्व असले तरी गतवर्षीपेक्षा कमीच द्राक्षाची निर्यात होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे म्हणणे आहे. यंदा द्राक्षाचे उत्पादन पदरी पडण्यापूर्वी एक ना अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. शिवाय उत्पादन घटले असून पुन्हा दरासाठी संघर्ष करावा लागला होता. पण आता निर्यात जोमात होत असून सर्वाधिक निर्यात ही युरोपमध्ये होत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युध्दाचा परिणाम अद्यापतरी निर्यातीवर झालेला नाही.
सांगली जिल्ह्यातील निर्यातीची काय आहे स्थिती?
यंदा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही वाढलेली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील 4 हजार 283 शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली होती तर यंदा यामध्ये 1 हजार 525 शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे. असे असतानाही हंगामाच्या सुरवातीला द्राक्ष हे निर्याती योग्यच झाले नव्हते. त्यामुळे वेग मंदावलेला होता. द्राक्षाला थंडीमुळे गोडी आणि अपेक्षित फुगवण ही झालेली नव्हती. निर्यातदार हे द्राक्ष खरेदी करण्यास धजत नव्हते. गेल्या आठवड्यापासून चित्र बदलले आहे. आठवड्याभरात 3 हजार 660 टन द्राक्ष हे निर्यात झाले आहेत तर एकाच आठवड्यात 1 हजार 300 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.
सर्वाधिक द्राक्ष निर्यात युरोपमध्ये
नाशिकसह सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात ही युरोपमध्ये होते. आता पर्यंत सांगली जिल्ह्यातून 4 हजार 564 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे पण त्यापैकी एकट्या युरोपमध्ये 1 हजार 628 टनाची निर्यात आहे. मागणीनुसार पुरवठा आणि या भागातील द्राक्षाच्या दर्जामुळे मागणी होत आहे. पण यंदा वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभारले होते. पण आता निर्यात वाढत असून झालेले नुकसान या निर्यातीमधून भरुन निघावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
म्हणून युध्दाचा परिणाम निर्यातीवर नाही
सांगली आणि नाशिक जिल्ह्यामधून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशामध्येही द्राक्ष निर्यात होते. आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून रशियामध्ये 116 टन द्राक्ष निर्यात झाले आहेत. हंगामाच्या सुरवातीपासूनच रशियामध्ये निर्यात सुरु होते अजूनपर्यंत तर परिणाम झालेला नाही शिवाय येथील मागणीप्रमाणे निर्यात ही अंतिम टप्प्यात असल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे कैलास भोसले यांनी सांगितले आहे. मात्र, भविष्यात युक्रेनमधील निर्यातीस अडचणी निर्माण होऊ शकतील. निर्यात केलेला माल कुठे उतरुन घ्यावयाचा याची अडचण निर्माण होईल पण सध्या दोन्ही देशांमध्ये द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरु असल्याचे कैलास भोसले यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Smart Farmer : सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचीही स्थिती, शेतकऱ्यांचा ‘प्लॅन’ होणार का यशस्वी?
अतिवृष्टीने खरिपाचे नुकसान रब्बीला जीवदान, नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पाची काय आहे स्थिती?