Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Farmer : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, नुकसानभरपाईसाठी आता आक्रमक पवित्रा, सरकारची भूमिका राहणार महत्वाची..!

मराठवाड्याची ओळख तशी दुष्काळी विभाग म्हणूनच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील चित्र बदलत आहे. यंदा तर नवलच झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे.

Nanded Farmer : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, नुकसानभरपाईसाठी आता आक्रमक पवित्रा, सरकारची भूमिका राहणार महत्वाची..!
नुकसानभरपाईसाठी नांदेडमधील शेतकरी हे आक्रमक झालेआहेत
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 5:45 PM

नांदेड : यंदाच्या खरिपात होतं..नव्हतं ते पावसाने हिरावलेले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय अगदी सुरवातीलाच आला होता. असे असताना जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली खरी पण ती देखील नुकसानीचीच ठरली. जुलै आणि 15 ऑगस्टपर्यंत (Heavy Rain) पावसाने अशी काय हजेरी लावली की खरिपातील सर्व पिके ही तब्बल दीड महिना ही पिके पाण्यात राहिलेली आहेत. त्यामुळे (State Government) राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन मदत करावी, यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज, विनंत्या केल्या मात्र, राज्य सरकारने हे गांभिर्यांने घेतलेच नाही. आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळेच बळीराजा आता रस्त्यावर उतरुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहे. (Nanded Farmer) नांदेड-लातूर मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको करीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

मराठवाड्याची ओळख तशी दुष्काळी विभाग म्हणूनच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील चित्र बदलत आहे. यंदा तर नवलच झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे येथील परस्थिती आणि शेतकऱ्यांचे हाल पाहता त्वरीत मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

नांदेड-लातूर महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या

गेल्या महिन्याभरात केवळ पीक पाहणी दौरे झाले आहेत. शिवाय प्रत्येक लोकप्रतिनीधींनी केवळ मदतीचे आश्वासन दिले असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. नांदेड-लातूर या महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती. शिवाय यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

यंदा हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. तब्बल दीड महिना पावसामध्ये सातत्य राहिल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना भरपाईच्या अनुशंगाने हेक्टरी 50 हजार रुपये ते देखील जिरायतीसाठी आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये आर्थिक मदत करावी. एवढेच नाहीतर ओला दुष्काळ जाहीर होताच त्या निकषाप्रमाणे मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.