Pune : खरीप पेरणीचा टक्का वाढला, उत्पादनाचे काय होणार? काय आहे पिकांची अवस्था?

खरीप हंगामाच्या अनुशंगाने यंदा जुलै महिना महत्वाचा ठरलेला आहे. कारण याच महिन्यात खरीपाच्या अधिकतर पेरण्या झाल्या आहेत शिवाय याच महिन्यात झालेल्या पावसाच्या आधारावर पिकांची वाढही होत आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा पुणे विभागातील सोलापूर जिल्हा आधी ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Pune : खरीप पेरणीचा टक्का वाढला, उत्पादनाचे काय होणार? काय आहे पिकांची अवस्था?
यंदा पुणे विभागाच सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 8:48 PM

पुणे : यंदा (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांना सभ्रमात टाकणारी स्थिती निर्माण झालेली आहे. जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिली त्यामुळे खरिपातील (Kharif Sowing) पेरण्या तर लांबणीवर पडल्याच पण मागणीच्या तुलनेत बी-बियाणांचा पुरवठाही झाला नाही. त्यामुळे शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात होता. सर्वकाही नुकसानीचे ठरत असताना जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या आधारावर खरीप पेरणीचा टक्का तर वाढला पण आता उत्पादनात काय होणार हे देखील पहावे लागणार आहे. पेरणीनंतरही वातावरणात मोठा बदल झाला असून सर्वकाही अलबेलच असे नाही. त्यामुळे (Pune Division) पुणे विभागात पेरणाची सरासरी ओलांडली असली तरी उत्पदनात वाढ झाली तरच शेतकऱ्यांचा उद्देश साध्य होणार आहे. पुणे विभागात सरासरीच्या तुलनेत 106 टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. 10 लाख 92 हजार हेक्टरावर पेरा झाला आहे.

पावसाच्या उघडीपीनंतर पीक वाढ जोमात

खरीप हंगामाच्या अनुशंगाने यंदा जुलै महिना महत्वाचा ठरलेला आहे. कारण याच महिन्यात खरीपाच्या अधिकतर पेरण्या झाल्या आहेत शिवाय याच महिन्यात झालेल्या पावसाच्या आधारावर पिकांची वाढही होत आहे. मात्र, विदर्भ, मराठवाडा पुणे विभागातील सोलापूर जिल्हा आधी ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शिवाय पाण्याचा निचरा झालेल्या क्षेत्रावरील पिकांची वाढ होत आहे. हे सर्व होत असले तरी अधिक काळ पिके पाण्यात राहिल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

पावसानंतर आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव

आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांना पावसाचा धोका होता. क्षमतेपेक्षा अधिकचा पाऊस हा सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. मात्र, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया या जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ज्या भागात नुकसान तिथे वातावरणारतील बदलामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किड व्यवस्थापन केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.

हे सुद्धा वाचा

पुणे विभागात असा हा पेरा

पुणे विभागात सरासरीच्या तुलनेत 110 टक्के म्हणजेच तब्बल 10 लाख 92 हजार हेक्टरावर पेरा झालेला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्ये पेऱ्याने सरासरी गाठली आहे. पुणे विभागात अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला आहे. जिल्ह्यात 3 लाख 28 हजार हेक्टारावर पेरा झाला आहे. तर या जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नगर जिल्ह्यामध्ये 5 लाख 91 हजार हेक्टर, पुणे 1 लाख 72 हजार हेक्टरावर पेरा झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.