Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला पुन्हा घरघर, सरकारचा हस्तक्षेपानंतरच मिळणार नवसंजीवनी..!
कधी बर्ड फ्लू चा वाढता प्रादु्र्भाव, तर कधी चिकनमुळे कोरोना होता अशा अफवांचा परिणाम गेल्या काही वर्षात कुक्कुटपालन व्यवसयावर झालेला आहे. आता कुठे हा शेतीशी निगडीत असलेला व्यवसाय रुळावर येत असतानाच एक नवेच संकट पोल्ट्रीधारकांसमोर उभे ठाकले आहे. पशूंना लागणाऱ्या खाद्य दरात तब्बल दुपटीपेक्षा अधिकची वाढ झालेली आहे. अंडी देणाऱ्या या पक्ष्यांचे खाद्य तयार करण्यासाठी सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी आणि शिंपले यासारख्याचा वापर केला जातो.
धुळे : कधी बर्ड फ्लू चा वाढता प्रादु्र्भाव, तर कधी चिकनमुळे कोरोना होता अशा अफवांचा परिणाम गेल्या काही वर्षात (Poultry Farm) कुक्कुटपालन व्यवसयावर झालेला आहे. आता कुठे हा शेतीशी निगडीत असलेला व्यवसाय रुळावर येत असतानाच एक नवेच संकट पोल्ट्रीधारकांसमोर उभे ठाकले आहे. पशूंना लागणाऱ्या (Animal food) खाद्य दरात तब्बल दुपटीपेक्षा अधिकची वाढ झालेली आहे. (Egg) अंडी देणाऱ्या या पक्ष्यांचे खाद्य तयार करण्यासाठी सोयापेंड, शेंगपेंड, तांदळाचा भुस्सा, मासळी आणि शिंपले यासारख्याचा वापर केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या खाद्यामध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रति अंड्यामागे 1 रुपया 25 पैशाची नुकसान सहन करण्याची नामुष्की व्यवसायिकांवर आलेली आहे. पशूंचे खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रति किलो २८ रुपयांपर्यंत खर्च येत आहे. त्यामुळे व्यवसायात तग कशी धरावी हा मोठा प्रश्न आहे.
सराकारच्या मदतीची गरज
पोल्ट्रीफार्म व्यवसयात सर्वात महत्वाचे आहे ते पाणी आणि पशूंना खाद्य. सध्या उन्हळ्यात पाण्याची तर समस्या आहेच पण खाद्याचे दर गगणाला भिडलेले आहेत. खाद्यासाठी आवश्यक असलेले तांदूळ, गहू, सोयापेंड, मका यावर अनुदान दिले तरच त्याची खरेदी शक्य होणार आहे. मध्यंतरी सोयापेंडच्या बाबतीत अशीच मागणी व्यवसायिकांनी केली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.यावेळी सरकारने लक्ष दिले तरच हे व्यवसाय जिवंत राहणार आहेत असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
एकूण खाद्याच्या दरात 60-70 टक्के वाढ
कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी मका 25 रुपये , सोयापेंड 66 रुपये , शेंगपेंड 52 रुपये , तांदूळ भुस्सा 20 रुपये , मासळी 40 रुपये आणि शिंपले 60 रुपये किलो दराने मिळत आहेत . त्यात पुन्हा औषधे , जीवनसत्त्वे आणि पोषक क्षारयुक्त अन्नाचा समावेश करावा लागतो . एकूण खाद्याच्या दरात 60-70 टक्के वाढ झाली आहे . दहा हजार पक्ष्यांमागे रोज 20 हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . अंड्याचा विक्री दर वाढवावा अन्यथा अनुदान तरी द्यावे , तरच हा व्यवसाय टिकेल असे म्हणणे व्यवसायिकांचे आहे.
पशूखाद्याच्या वाढत्या दरामुळे असे चुकले गणित
पशूंचे खाद्य तयार करण्यासाठी सोयापेंड , शेंगपेंड , तांदळाचा भुस्सा , मासळी , शिंपले आणि काही औषधांसह व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा वापर केला जातो. हे खाद्य तयार करण्यासाठी सध्या प्रति किलो 28 रुपयांपर्यंत खर्च येत आहे . मागील काही दिवसांपासून प्रति किलो खर्चात दहा रुपयांची वाढ झाली आहे . या पूर्वी खाद्याचा खर्च उत्पादनाच्या 80 टक्क्यांवर जात होता , तो आता 120 टक्क्यांवर गेला आहे. एका अंडयाचा उत्पादन खर्च 4 रुपये 50 पैसे आहे , तर विक्री 3 रुपये 40 पैशांनी होते आहे. प्रति अंड्यामागे सव्वा रुपये तोटा होत आहे.
संबंधित बातम्या :
Cotton Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी दर, नेमका फायदा कुणाला?
Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढले दर, सोयाबीनचे काय चित्र?
काय सांगता ? 11 वर्षापूर्वी मयत झालेला व्यक्ती थेट रोजगार हमी योजनेवर, अमरावतीमध्ये अनियमितेची ‘हमी’