मालाची आवक घटल्याने शहाळ्याची किंमत चक्क १० ते १५ रुपयांनी वाढवली
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथून नारळ विक्रीसाठी महाराष्ट्रात आणले जातात. दक्षिणेतील विविध राज्यांतून येणारा नारळ मुंबईत दाखल होतो आणि तो पुढे नवी मुंबई, ठाणे ,कल्याण , डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात विक्रीसाठी नेला जातो.
कल्याण : दक्षिण भारतातून मुंबई (mumbai), ठाणे (thane) तसेच आसपासच्या शहरांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शहाळ्याची आवक गेल्या काही दिवसांपासून रोडावल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा (temprature) प्रचंड वाढू लागल्यामुळे नागरिकांचा ओढा शहाळ्याचे पाणी पिण्याकडे वाढत असतानाच आवक कमी झाल्याने विक्रेत्यांनी शहाळ्याची किंमत चक्क 10 ते 15 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी 60 ते 70 रुपये नग या दराने शहाळ्याची विक्री केली जात आहे.
व्यापारी काय म्हणाले
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश येथून नारळ विक्रीसाठी महाराष्ट्रात आणले जातात. दक्षिणेतील विविध राज्यांतून येणारा नारळ मुंबईत दाखल होतो आणि तो पुढे नवी मुंबई, ठाणे ,कल्याण , डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात विक्रीसाठी नेला जातो. मात्र प्रतिकूल हवामानामुळे यंदा नारळाचे पीक कमी आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केरळ, आंध्र प्रदेश या भागांतून मुंबईत होणाऱ्या नारळाची आवक कमी झाल्याने 50 रुपयांना मिळणारे उत्तम प्रतीचे शहाळे या आठवडय़ात 60 ते 70 रुपयांना विकले जाऊ लागले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
शेतीकरी गुंतले पेरणीच्या कामात
देशात सध्या अनेक राज्यात उष्णता असल्यामुळे त्याचा सध्याच्या पीकांवर चांगलाचं परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही पीकांचे दर सुध्दा वाढले आहेत. काही पीकांची बाजारात आवक वाढली असल्यामुळे त्यांचे दर कमी झाले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या मान्सनपूर्व मशागतीमध्ये शेतकरी वर्ग व्यक्त आहे. अनेक ठिकाणी १ जून पासून कृषी केंद्रावर बियाणांची विक्री होणार आहे. त्यामुळे शेतकरी मान्सूनची वाट पाहत असून लवकरचं पेरणीची कामे करताना दिसणार आहे