Latur Market : शेतीमालाचे दर स्थिरावले, आता खरेदी केंद्रावर अधिकची आवक, कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमालीचा शुकशुकाट आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरु असून आवक असलेल्या तिन्हीही शेतीमालाच्या दरात घट होऊ स्थिरावलेले आहेत. येथील बाजार समितीमध्ये अधिकतर सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याची आवक होती पण गेल्या दरात घसरण सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे.
लातूर : गेल्या काही दिवसांपासून (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमालीचा शुकशुकाट आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरु असून आवक असलेल्या तिन्हीही (Agricultural commodities Rate) शेतीमालाच्या दरात घट होऊ स्थिरावलेले आहेत. येथील बाजार समितीमध्ये अधिकतर सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याची आवक होती पण गेल्या दरात घसरण सुरु झाल्याने (Farmer) शेतकऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आवक सुरु आहे परंतु हरभरा आणि तुरीच्या आवकवर घटत्या दराचा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे नाफेडच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावरील आवक ही वाढत आहे.
सोयाबीन स्थिर, तूर अन् हरभऱ्याच्या दरात घसरण
सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन आता संपत असतानाही सोयाबीनचे दर हे 8 हजारापेक्षा अधिक झाले नाहीत. मात्र, दिवाळीनंतर वाढत्या दराने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. हरभऱ्याचे उत्पादन वाढले असले तरी अपेक्षित दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे हमीभाव केंद्रावरील दर आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये 800 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्रावरच विक्री करण्यावर भर देत आहे. खुल्या बाजारपेठेतील दर दिवसेंदिवस घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत दर कमीच
राज्यात नाफेड च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर आहे. मध्यंतरी हमीभावापेक्षा अधिकचा दर बाजारपेठेत मिळत होता. मात्र, तुरीच्या मुक्त आयात धोरणामध्ये वाढ केल्यानंतर समीकरणे बदलली असून आता तुरीच्या दरात घसरण होत आहे. 15 दिवसांमध्ये तुरीच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या 6 हजार 100 असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आता खरेदी केंद्राकडे विक्री करु लागले आहेत.
सोयाबीन बाजारात, तुरीबाबत सावध भूमिका
सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनही काढणीला येणार आहे. त्यामुळे सोयाबीन साठवणूकीपेक्षा विक्रीवरच शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे दर सरासरीएवढा असतानाही सोयाबीनची आवक ही वाढलेली आहे. तुरीच्या दरात झपाट्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. भविष्यात दर वाढतील या आशेवर साठवणूक केली जात आहे. तुरीच्या उत्पादनात घट होऊनदेखील ही अवस्था केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे ओढावली असल्याचा आरोप होत आहे.
संबंधित बातम्या :
Farmer : कर्जमाफीची घोषणा, अंमलबजावणीबाबत देशातील चित्र काय? नाबार्डचा अहवाल
Cotton Rate : संपूर्ण हंगामात कापसाला वाढीव दराची झळाळी, अंतिम टप्प्यात विक्रमी दर