Paddy Crop : खरेदी केंद्र बंद, शिल्लक धान पिकाचे करायचे काय ? विदर्भातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

गेल्या 5 दिवसांपासून विदर्भात पाऊस हा सक्रिय झाला आहे. शिवाय धान पिकाच्या पेऱ्यासाठी हा पाऊस पोषक असून कुठे मशागतीची कामे तर कुठे प्रत्यक्ष पेरणीलाही सुरवात झाली आहे. ही शेती कामे पार पाडत असताना शिल्लक धानाचा साठा आणि त्याची सुरक्षितता महत्वाची आहे. रब्बी हंगामात पोषक वातारणामुळे उत्पादनात वाढ झाली पण त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना झालाच नाही.

Paddy Crop : खरेदी केंद्र बंद, शिल्लक धान पिकाचे करायचे काय ? विदर्भातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
धान पीकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:00 AM

गोंदिया : विदर्भातील (Gondia Farmer) गोंदिया जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आलेले (NAFED) खरेदी केंद्र हे बंद झाले आहे. धान पिकांच्या खरेदीचा लक्षांक ठेऊनच ही खरेदी केंद्र सुरु झाली होती. पण अवघ्या 15 दिवसांमध्ये (Paddy Crop) धानाची खरेदी करुन केंद्रांनी आपला घाशा गुंडाळला आहे. तर दुसरीकडे रब्बीतील पोषक वातावरणामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याने धान पिक शिल्लक आहे. शिवाय आता विदर्भात पाऊस सक्रीय झाल्याने हे धान्य ठेवायचे कुठे असा सवाल उपस्थित झाला आहे. गोंदियातील शेतकऱ्यांना केवळ खरेदी केंद्राचाच आधार असतो पण सरकारने आपल्या क्षमतेप्रमाणे खरेदी पूर्ण झाली की खरेदी केंद्र बंद केले आहेत. लक्षांक साधण्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी होण्यापूर्वीच ही केंद्र बंद झाले आहेत.

पेरणीची लगबग अन् धानाची चिंता

गेल्या 5 दिवसांपासून विदर्भात पाऊस हा सक्रिय झाला आहे. शिवाय धान पिकाच्या पेऱ्यासाठी हा पाऊस पोषक असून कुठे मशागतीची कामे तर कुठे प्रत्यक्ष पेरणीलाही सुरवात झाली आहे. ही शेती कामे पार पाडत असताना शिल्लक धानाचा साठा आणि त्याची सुरक्षितता महत्वाची आहे. रब्बी हंगामात पोषक वातारणामुळे उत्पादनात वाढ झाली पण त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना झालाच नाही. यंदा खरेदी केंद्र सुरु होतानाच त्यांना लक्षांक ठरवून देण्यात आला होता. शिवया केंद्राचे खासगीकरण झाल्याने ठिकठिकाणी केंद्र उभारुन अवघ्या 15 दिवसांमध्ये उद्दिष्ट साधण्यात आले. त्यामुळे पेरणीची लगबग आणि त्यात शिल्लक धानाची चिंता अशा दुहेरी संकटात गोंदियातील शेतकरी आहेत.

हमी भावाच्या खरेदीने वाढले क्षेत्र

विदर्भातील शेतकऱ्यांचे धान पिक हे मुख्य पीक असले तरी खरिपातच त्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गतवर्षी मात्र, पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातही धान पिकाचे उत्पादन घेतले होते. शिवाय उत्पादन वाढूनही खरेदी केंद्रावर सर्व मालाची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामात धान पिकाचे क्षेत्रात कमालीची वाढ आणि पोषक वातावरणामुळे उत्पादनही वाढले. असे असले तरी खरेदी केंद्रांनी आपला कोटा ठरवून घेतला आणि शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. आता पुन्हा खरिपात धान पिकाचीच लागवड होत आहे. भविष्यात असेच धोरण राहिले तर काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

शेतशिवारात अन् घरादारात धान पिकच

दरवर्षी पावसाला सुरवात होण्यापू्र्वीच धानाची खरेदी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कधी झालेच नाही. यंदा खरेदी केंद्रही उशिराने सुरु झाली आणि ते ही नियम अटींसह. त्यामुळे शेतात साठवलेले धानाचे पावसामुळे नुकसान होत आहे. तर घरामध्ये धानाच्या थप्पी लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये पावसाने धान पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरेदी केंद्र पुन्हा कधी सुरु होणार अशी विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.