Crop Change : खरिपात मुख्य पिकाला औषधी वनस्पतीचा पर्याय, कमी खर्चात अधिकच्या उत्पन्नासाठी मधला मार्ग

औषधी वनस्पतीला बारामाही मागणी असते. त्यामुळे मार्केटचा विषय नाही तर उत्पादनाचा आहे. सध्या जून महिना अंतिम टप्प्यात आहे आणि अजून म्हणावे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जूनच्या अंतिम टप्प्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात औषधी वनस्पतीची लागवड केली तर अधिकचा फायदा होणार आहे.

Crop Change : खरिपात मुख्य पिकाला औषधी वनस्पतीचा पर्याय, कमी खर्चात अधिकच्या उत्पन्नासाठी मधला मार्ग
औषधी वनस्पती
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 5:24 PM

मुंबई : राज्यासह इतरत्र सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. (Monsoon) पावसाने उघडीप दिली असली तरी बळीराजा मात्र पू्र्ण तयारीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा भर आहे हंगामातील भात, मका, कापूस, सोयाबीन या पिकांवरच आहे. असे असले तरी पीक पध्दतीमध्ये बदल करुन अधिकच्या उत्पादनासाठी काही शेतकऱ्यांचा प्रयोग हा सुरु आहे. अशात कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळवण्याचा रामबाण मार्ग म्हणजे (Medicinal Plantऔषधी वनस्पती. आजही शेतकरी या प्रकरची शेती करतात पण त्याचे प्रमाण नगण्य आहे. बाजारपेठेत औषधी वनस्पतीला अधिकची मागणी आहे. असे असताना क्षेत्र वाढवण्याची शेतकऱ्यांना सुवर्णसंधी आहे. शिवाय याकरिता सरकारी मदतही केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी या वनस्पतीकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

हीच योग्य वेळ निर्णय घेण्याची

औषधी वनस्पतीला बारामाही मागणी असते. त्यामुळे मार्केटचा विषय नाही तर उत्पादनाचा आहे. सध्या जून महिना अंतिम टप्प्यात आहे आणि अजून म्हणावे त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जूनच्या अंतिम टप्प्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात औषधी वनस्पतीची लागवड केली तर अधिकचा फायदा होणार आहे. यावेळी पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. शिवाय पावसाळ्यात सिंचनाचा खर्च वाचू शकतो. या वेळी लागवड करता येणाऱ्या औषधी वनस्पतींमध्ये लिंबाचा घास, कवचबीज, ब्राह्मी व कोरफड या वनस्पतींचा प्रामुख्याने समावेश होतो.

कवचबीज

कवच बीज ही एक मैदानी प्रदेशातील झाडाझुडपासारखी वनस्पती आहे. याची लागवड शेतकरी 15 जून ते 15 जुलै दरम्यान करू शकतात. पेरणीसाठी एकरी 6 ते 8 किलो दराने बियाणे लागते. एका एकरात या बीजाची लागवड करण्यासाठी 50-60 हजार रुपये खर्च येतो, तर कमाई 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. कृषी विभागाने याबाबत जनजागृती केली तर अधिकचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.

हे सुद्धा वाचा

ब्राह्मी सोबतच कोरफडीचीही लागवड

औषधी वनस्पतीमध्ये ब्राम्ही ही लोकप्रिय आहे. या वनस्पतीचा वापर अनेक प्रकारच्या औषधांमध्ये केला जातो. कंपनीकडून थेट शेतकऱ्यांशी या वनस्पतीसाठी करार केला जातो. गरजेनुसार मागणी आणि त्याचप्रमाणात पुरवठा करुन शेतकरी चांगला नफा कमवू शकतात.सध्याचा काळ हाच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य आहे. शेतकरी यावेळी ब्राह्मीसोबत कोरफडचीही लागवड करू शकतात. ही एक प्रचलित वनस्पती आहे आणि अलिकडच्या वर्षांत त्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. कोरफड लागवडीसाठी शेतकऱ्यांना अजूनही पुरेसा वेळ आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत ते बसवता येईल. शिवाय आरोग्यविषयक या वनस्पतीचे महत्व असून दिवसेंदिवस मागणीही वाढत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.