Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : ऊसाचे गाळप नाहीतर साखर कारखान्याला गावचे पाणी कशामुळे? अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला

लातूर-बार्शी रोडवरील निवळी गावच्या शिवारात विलास साखर कारखाना उभारलेला आहे. शिवाय ऊस गाळपासाठी कारखान्याने हे गाव दत्तक घेतले आहे. असे असताना गावचा ऊस सोडून इतर ठिकाणाहून गेटकेन पध्दतीने उसाचे गाळप सुरु आहे. अगोदर गावातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकऱ्यांची असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गाव शिवारातील ऊस गाळपाविना फडातच उभा आहे.

Latur : ऊसाचे गाळप नाहीतर साखर कारखान्याला गावचे पाणी कशामुळे? अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला
लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास साखर कारखान्याकडून उसाचे गाळप केले जात नसल्याने येथील ग्रामस्थांनी कारखान्याला होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे.
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:08 PM

लातूर : राज्यात (Marathwada Division) मराठवाडा विभागात सर्वाधिक (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्येच साखर कारखान्यांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. तालुक्यातील निवळी गाव हे (Sugar Factory) विलास साखर कारखान्याने गाळपासाठी दत्तक घेतले आहे. असे असताना गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतरांच्या कारखान्यावर ऊस गाळप करावा लागत असल्याने आता कारखान्याला होणार पाणीपुरवठाही बंद करण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतलाय. ज्या कारखान्याला दत्तक घेतलेल्या गावच्या उसाची चिंता नाही तर त्या कारखान्याला गावातून पाणीपुरवठा देखील होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका निवळी गावच्या ग्रमस्थांनी घेतली आहे. निवळी गावच्या शिवारातच कारखाना उभारला असून त्याचा लाभ गावच्या शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री टॅंकरने कारखान्याला पाणीपुरवठा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टॅंकर अडवून पाणी न घेऊ देता परत पाठवला आहे.

कारखान्याने गाव दत्तक घेऊनही अन्यायच

लातूर-बार्शी रोडवरील निवळी गावच्या शिवारात विलास साखर कारखाना उभारलेला आहे. शिवाय ऊस गाळपासाठी कारखान्याने हे गाव दत्तक घेतले आहे. असे असताना गावचा ऊस सोडून इतर ठिकाणाहून गेटकेन पध्दतीने उसाचे गाळप सुरु आहे. अगोदर गावातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकऱ्यांची असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गाव शिवारातील ऊस गाळपाविना फडातच उभा आहे. कारखान्याच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे आता कारखान्याला होणारा पाणीपुरवठा देखील बंद करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

मध्यरात्रीच टॅंकर चालकासोबत हुज्जत

येथील विलास साखर कारखान्यासाठी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. असे असताना रात्री-अपरात्री टॅंकरद्वारेही गावातील जलस्त्रोतातून पाणी उपसा हा सुरुच आहे. शनिवारी मध्यरात्री पाण्यासाठी गावात टॅंकर येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची अडवणूक केली. गावातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय गावचे पाणी कारखान्याला दिले जाणार नसल्याची भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, दोन टॅंकर आणि एक अग्निशमन पथकातील वाहन पाण्यासाठी गावात आले होते. पण गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे ही वाहने रिकामी परतली.

हे सुद्धा वाचा

कारखाना उशाला असताना अतिरिक्त उसाचा प्रश्न

राज्यात सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यात आहे. शिवाय येथील ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून वाहने दाखल होत आहेत. असे असताना दत्तक घेतलेल्या गावाकडे दुर्लक्ष का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पाण्यासाठी आलेली वाहने शेतकऱ्यांनी पहाटेपर्यंत अडवूण ठेवली व पहाटे ती रिकामीच पाठवली. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न आता पाणी द्यायचे की नाही इथपर्यंत येऊन ठेपला आहे. आणखीन 15 दिवस अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागला नाहीतर यावरुन काय होईल हे सांगता येत नाही.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.