Kharif Season : खरिपातील सोयाबीन बियाणाची चिंता मिटली, उन्हाळी बिजोत्पादन मात्र संकटात
बघता..बघता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. गतवर्षीच्या नुकासनीनंतर याचा केवळ उत्पादनावरच नाही तर आगामी हंगामातील बियाणावरही परिणाम होणार असल्याचे सांगितले जात होते. पण यंदा देशात 67 लाख टन सोयाबीन उपलब्ध आहे .त्यामुळे यंदा सोयाबीन बियाणाची टंचाई भासणार नाही पण शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन वापरणे गरजेचे आहे. कारण सध्याचे सोयाबीनचे दर पाहता गतवर्षी नुकसान होऊनही पेरणी क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.
पुणे : बघता..बघता (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर आला आहे. गतवर्षीच्या नुकासनीनंतर याचा केवळ उत्पादनावरच नाही तर आगामी हंगामातील (Soybean Seeds) बियाणावरही परिणाम होणार असल्याचे सांगितले जात होते. पण यंदा देशात 67 लाख टन सोयाबीन उपलब्ध आहे .त्यामुळे यंदा सोयाबीन बियाणाची टंचाई भासणार नाही पण शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन वापरणे गरजेचे आहे. कारण सध्याचे (Soybean Rate) सोयाबीनचे दर पाहता गतवर्षी नुकसान होऊनही पेरणी क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे. त्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून घरचे बियाणेही तयारीच ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यंदाचे सोयाबीनचे उत्पादन 118 लाख टनावर स्थिरावणार असल्याचा अंदाज आहे. पण यामधील 67 लाख टन सोयाबीन हे सध्या उपलब्ध असून याचा बियाणे म्हणूनच वापर होणार आहे.
अधिकच्या दरामुळे सोयाबीनवरच भर
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. असे असले तरी गेल्या 6 महिन्यातील सोयाबीनचे दर पाहता यंदाही क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे. गतवर्षी राज्यात 48 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला होता. सोयाबीन एक शाश्वत पीक मानले जात आहे. शिवाय पेरणीपासून काढणीपर्यंतची प्रक्रिया ही इतर पिकांपेक्षा सोपी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सोयाबीन क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.
गाळपाविना 67 लाख टन सोयाबीन उपलब्ध
गतवर्षी नुकसान होऊन देखील देशात 118 लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. शिवाय बियाणांसाठी तब्बल 67 लाख टन सोयाबीन हे शिल्लक असल्याचे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशने सांगितले आहे. त्यामुळे एवढ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले तर खरिपात बियाणांची टंचाई भासणार नाही. पण शेतकऱ्यांनी आतापासूनच घरच्या बियाणांची उगवण क्षमता किंवा बियाणे घेऊन त्याची साठवणूक करणे गरजेचे आहे.
उन्हाळी बिजोत्पादन संकटात
यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला आहे. शिवाय हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरणामुळे सोयाबीन बहरतही होते पण मध्यंतरी वाढलेल्या उन्हाचा परिणाम सोयाबीनच्या गुणवत्तेवर झाला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन होईल की नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. गुणवत्तेबरोबर उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारीत असणे केव्हाही चांगलेच.
संबंधित बातम्या :
Unseasonable Rain : मराठवाड्यावरही अवकाळीची अवकृपा, हंगामी पिकांचे नुकसान
Loan Waiver : ‘नाबार्ड’ चा धक्कादायक अहवाल, कर्जमाफीमुळेच शेतकरी कर्जबाजारी, नेमकी काय आहेत कारणे ?