Surplus Sugarcane : अतिरिक्त उसाची जबाबदारी ही संबंधीत साखर कारखान्यावर, साखर आयुक्तांचे काय आहे नियोजन?

यंदाच्या हंगामात अतिरिक्त ऊस असल्यामुळे त्याचे गाळप होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टळणे गरजेचे आहे. त्यामुळेच नियमानुसार अतिरिक्त उसाचे वाटप हे साखर कारखाना निहाय केले जाणार आहे. अतिरिक्त उसाची तोडणी आणि वाहतूक लागलीच करावी अशी मागणी होते. एवढेच नाही तर या अतिरिक्त वाटप केलेल्या या उसाचे गाळप करण्यासाठी संबंधित साखर कारखान्याला आता तोडणीचे वेळापत्रक हे ग्रामपंचायत व गट कार्यालयात लावणे गरजेचे आहे.

Surplus Sugarcane : अतिरिक्त उसाची जबाबदारी ही संबंधीत साखर कारखान्यावर, साखर आयुक्तांचे काय आहे नियोजन?
जून महिना उजाडला ती लातूर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 1:50 PM

पुणे : आतापर्यंत (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाला घेऊन एक ना अनेक उपाययोजना समोर आल्या पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मे महिना मध्यावार आला तरी (Maharshtra) राज्यात 27 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. त्यामुळे याचे सुक्ष्म नियोजन केले तरच (Sugarcane) उसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याअनुशंगाने आता सार्वजिनक उपक्रम नाही तर एका साखर कारखान्याकडे त्याचे क्षेत्र हे आखून दिले जणार आहे. त्यामुळे साखर कारखानाही आपले टार्गेट समोर ठेऊन उसाचे गाळप करणार आहे. सध्या मे महिना सुरु असून या महिन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली लागला तरच नुकसान हे टळणार आहे.

कारखानानिहाय अतिरिक्त ऊसाचे वाटप

यंदाच्या हंगामात अतिरिक्त ऊस असल्यामुळे त्याचे गाळप होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टळणे गरजेचे आहे. त्यामुळेच नियमानुसार अतिरिक्त उसाचे वाटप हे साखर कारखाना निहाय केले जाणार आहे. अतिरिक्त उसाची तोडणी आणि वाहतूक लागलीच करावी अशी मागणी होते. एवढेच नाही तर या अतिरिक्त वाटप केलेल्या या उसाचे गाळप करण्यासाठी संबंधित साखर कारखान्याला आता तोडणीचे वेळापत्रक हे ग्रामपंचायत व गट कार्यालयात लावणे गरजेचे आहे. शिवाय गाळप होताच त्यासंबंधीचा अहवाल हा साखर आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.

अतिरिक्त उसाचे गाळप करताना घ्यावयाची काळजी

ज्या साखर कारखान्याला क्षेत्र ठरवून दिले आहे त्याच क्षेत्रातील उसाचे गाळप करायचे आहे. गाळपासाठी वाटलेल्या उसाची तारखेनिहाय व शेतकरी निहाय नोंद असणे गरजेचे आहे. त्यामुळे कारभारात नियमितता येईल शिल्ल्क उसाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

कारखान्यांना कार्यक्षेत्राचे वाटप, हंगाम अंतिम टप्प्यात

गाळप हंगाम पूर्ण होण्याअगोदर राज्यात उस शिल्लक राहू नये हा साखर आयुक्त यांचा मानस असून त्याअनुशंगाने प्रयत्न केले जात आहेत. येत्या 25 दिवासांमध्ये हा अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास साखर कारखान्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रयत्न आणि आता प्रत्यक्षा अंमलबजावणीची वेळ आली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा अंतिम उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे किमान काढून उसाचे नुकसान होण्यापूर्वी त्याचे गाळप होईल कसे याचेच नियोदन केले जात आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.