Chickpea Crop : हमीभावपेक्षा कमी दर तरीही खुल्या बाजारपेठेतच हरभऱ्याची विक्री, शेतकऱ्यांच्या निर्णयामागचे कारण काय?
रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरु होताच हमीभाव केंद्र उभारणीची मागणी पुढे आली होती. नाफेडच्या माध्यमातून उशिरा का होईना आता 1 मार्चपासून हमीभाव केंद्र ही सुरु करण्यात आलेली आहेत. बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावरचा हमी भाव अधिकचा असल्याने केंद्रावर आवक वाढेल असा अंदाज होता. अन्यथा खुल्या बाजारातील दर वाढतील असेही सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात चित्र हे वेगळेच आहे.
लातूर : रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभरा पिकाची आवक सुरु होताच हमीभाव केंद्र उभारणीची मागणी पुढे आली होती. नाफेडच्या माध्यमातून उशिरा का होईना आता 1 मार्चपासून (Guarantee Rate) हमीभाव केंद्र ही सुरु करण्यात आलेली आहेत. बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावरचा हमी भाव अधिकचा असल्याने केंद्रावर आवक वाढेल असा अंदाज होता. अन्यथा (Latur Market) खुल्या बाजारातील दर वाढतील असेही सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात चित्र हे वेगळेच आहे. आता हरभऱ्यासाठीची खरेदी केंद्र सुरु होऊन 20 दिवस झाले आहेत. आतापर्यंत नोंदणी होऊन हरभऱ्याची आवक सुरु होणे अपेक्षित होते. पण आवक ही खुल्या बाजारातच होत आहे. दरात तफावत असली तरी खुल्याबाजारात दाखल होईल तो माल व्यापारी खरेदी करतात तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर मालाचे मुल्यमापन करुनच खरेदी केली जात आहे. येथील नियम-अटींमुळेच शेतकरी हे खुल्या बाजारात हरभरा विक्रीला प्राधान्य देत आहेत.
दरांमध्ये 700 रुपायांची तफावत
सध्या राज्यभरात खरेदी केंद्र आणि बाजार समिती अशा दोन्हा ठिकाणी हरभऱ्याची आवक सुरु आहे. मात्र, खुल्या बाजारातच अधिकची आवक आहे. गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 हजार पोत्यांची आवक झाली होती तर दर हा 4 हजार 500 रुपये मिळाला होता. तक लागूनच असलेल्या खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर असतानाही आवकही कमी होती. दरात मोठी तफावत असली तरी येथील नियम-अटी आणि माल विक्री केल्यानंतर महिन्याभराने जमा होणारे पैसे ही सर्व प्रक्रिया किचकट आहे. शेतकऱ्यांनी मालाची विक्री झाली की पैसे हातात पाहिजेत. त्यामुळेच खुल्या बाजारात कमी दर असूनही अधिकची आवक आहे.
खरेदी केंद्रावरील नियम-अटी
केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असली तरी याठिकाणचे नियम-अटी शेतकऱ्यांना पचनी पडत नाहीत. हरभऱ्यामध्ये 10 टक्के पेक्षा अधिक आर्द्रतेचे प्रमाण असल्यास माल घेतला जात नाही. शिवाय नोंदणीनुसारच शेतकऱ्यांना माल घेऊन यावा लागतो. शिवाय ऑनलाईन पीकपेरा आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकरी थेट खुल्या बाजारात हरभरा खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळे दरात मोठी तफावत असली तरी खरेदी केंद्र ही ओस पडलेली आहेत.
दरात घसरण झाल्यानंतर सोयाबीन स्थिर
गतमहिन्यात 7 हजार 600 वर गेलेले सोयाबीन सध्या 7 हजार 250 वर येऊन ठेपले आहे. दरात घसरण होऊनही आवक ही सुरुच आहे. शेतकऱ्यांनी आता साठवणूकतले सोयाबीन विक्रीसाठी काढलेले आहे. भविष्यात यापेक्षा दर घटून अधिकचा फटका बसण्यापेक्षा आहे तो माल विकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
संबंधित बातम्या :
Crop Insurance : खरिपापूर्वीच पीकविमा योजनेचा निर्णय, केंद्राबरोबर की राज्याची स्वतंत्र यंत्रणा..!
Photo Gallery : अतिरिक्त ऊस कारखान्यावर नव्हे तर फडातच आगीच्या भक्षस्थानी, काय आहेत कारणे?